मीनाक्षी शेषाद्रीचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?, देश सोडून परदेशात स्थायिक झाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:25 AM2023-11-16T11:25:24+5:302023-11-16T11:35:28+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आता ओळखणे कठीण झाले आहे.

Meenakshi seshadri birthday know in detail about hero ghatak damini actress life career unknown facts | मीनाक्षी शेषाद्रीचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?, देश सोडून परदेशात स्थायिक झाली अभिनेत्री

मीनाक्षी शेषाद्रीचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?, देश सोडून परदेशात स्थायिक झाली अभिनेत्री

80 व 90 च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri) . दामिनी, हिरो, घातक असे सुपरहिट सिनेमे देणाºया मिनाक्षीनं स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांसोबत तिने काम केलं. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. पण नाव, प्रसिद्धी, पैसा असं सगळं काही असताना मिनाक्षीने एकाएकी सिनेसृष्टीला रामराम ठोकला.

 मीनाक्षी शेषाद्रीचा जन्म 16 नोव्हेंबर 1963 रोजी धनबादमध्ये झाला. आज तिचा वाढदिवस आहे. मीनाक्षीचं खरं नाव 
 नाव शशिकल शेषाद्री आहे. मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर मीनाक्षीने पेंटर बाबू या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, तिला खरी ओळख जॅकी श्रॉफसोबतच्या हिरो या चित्रपटातून मिळाली.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मीनाक्षीने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली. अमिताभ बच्चन ते सनी देओल, अनिल कपूर, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे.

मीनाक्षीला 'मेरी जंग', 'शहेनशाह', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील दमदार भूमिकांमुळे लक्षात ठेवले जाते. मीनाक्षी शेषाद्रीने हरीश म्हैसूर नावाच्या बँकरशी लग्न केले. लग्नानंतर मीनाक्षी भारत सोडून अमेरिकेत शिफ्ट झाली. शेषाद्री आणि हरीश यांना दोन मुले आहेत. मीनाक्षी आता नृत्य अकादमी चालवते आणि मुलांना ही कला शिकवते.
 

Web Title: Meenakshi seshadri birthday know in detail about hero ghatak damini actress life career unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.