Meenakshi Seshadri सोबतच्या अफेअरमुळे मोडला होता या प्रसिद्ध गायकाचा संसार, पत्नीने दिला होता घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:12 AM2022-12-31T11:12:59+5:302022-12-31T11:13:50+5:30
Meenakshi Seshadri : हा अफेअरचा संपूर्ण किस्सा आहे त्यावेळची टॉपची हिरोईन मीनाक्षी शेषाद्रिचा. मीनाक्षी शेषाद्रिने त्यावेळी अनेक सुपहिट सिनेमे दिले होते. ती तिच्या खास अभिनयासाठी आणि डान्ससाठी ओळखली जात होती.
Meenakshi Seshadri : फिल्म इंडस्ट्रीमध्ये अफेअर होणं आणि ब्रेकअप होणं कॉमन बाब आहे. पण चर्चा तेव्हा जास्त होते जेव्हा या अफेअरचा फॅमिली लाइफवर प्रभाव पडतो. आज आम्ही तुम्हाला 90च्या दशकातील एका अशा फेमस अफेअरबाबत सांगणार आहोत, ज्याची खूप चर्चा झाली होती.
हा अफेअरचा संपूर्ण किस्सा आहे त्यावेळची टॉपची हिरोईन मीनाक्षी शेषाद्रिचा. मीनाक्षी शेषाद्रिने त्यावेळी अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. ती तिच्या खास अभिनयासाठी आणि डान्ससाठी ओळखली जात होती. अनेक मोठ्या स्टार्ससोबत तिने कामे केली. घायल, दामिनी हे तिचे सगळ्यात गाजलेले सिनेमे. त्यावेळी ती तिच्या कामासोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत होती. एकेकाळी मीनाक्षीचं नाव जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरसोबतही जोडलं जात होतं.
ज्या अफेअरची सगळ्यात जास्त चर्चा झाली ते होतं मीनाक्षी शेषाद्रि आणि गायक कुमार सानू (Kumar Sanu) चं अफेअर. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही ‘जुर्म’ सिनेमाच्या शूटिंगवेळी जवळ आले होते. या सिनेमात मीनाक्षी मुख्य अभिनेत्री होती तर कुमार सानूने यातील गाणी गायली होती. यातील ‘जब कोई बात बिगड़ जाए’ हे गाणं फार गाजलं होतं. जे मीनाक्षीवर शूट करण्यात आलं होतं.
जुर्म सिनेमा रिलीज होईपर्यंत मीनाक्षी आणि कुमार सानूच्या अफेअरची चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली होती. असं सांगितलं जातं की, आधीच विवाहित असलेल्या कुमार सानूच्या पत्नीला जेव्हा या अफेअरबाबत समजलं तेव्हा त्याची घरी खूप वाद झाला.
वेळ इतकी आली की, कुमार सानूचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. तेच नंतर मीनाक्षीनेही कुमार सानूची साथ सोडली होती. म्हणजे मीनाक्षी त्याच्या आयुष्यात येऊ शकली नाही आणि त्याच्या आयुष्यातील पत्नी दूर गेली. नंतर मीनाक्षी बॅंकर हरीश मैसूरसोबत लग्न केलं होतं आणि ती बॉलिवूड सोडून अमेरिकेत सेटल झाली होती.