विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून बर्बाद झाले अभिनेत्री मिनाषी शिषाद्रीचं करिअर, इंडस्ट्रीला करावा लागला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:21 IST2022-03-03T18:18:23+5:302022-03-03T18:21:25+5:30
त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून बर्बाद झाले अभिनेत्री मिनाषी शिषाद्रीचं करिअर, इंडस्ट्रीला करावा लागला रामराम
'हीरो', 'मेरी जंग', 'शहेनशाह', 'घायल', 'दामिनी', 'घातक' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) ने काम केलं. या वयातही ती कमालीची सुंदर दिसते. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. . यानंतरही तिला अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या. पण तिने सगळ्या ऑफर्स नाकारल्या.
मिनाक्षी चित्रपटसृष्टीत असतानादेखील तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. तिचं सौंदर्य बघून अनेकजण तिच्या प्रेमात पडायचे. मीनाषी शेषाद्रीसोबत एक अशी घटना घडली ज्यामुळे तिला इंडस्ट्री सोडावी लागली. आपल्या सुपरहिट गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कुमार सानू(Kumar Sanu) मीनाक्षीला पाहताच तिच्या प्रेमात पडले. पण त्यावेळी ते विवाहीत होते. मिनाक्षी आणि गायक कुमार सानू यांच्या अफेअरची तर त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. जब कोई बात बिगड जाये हे मिनाक्षी शेषाद्रीवर चित्रीत करण्यात आलेले गाणे कुमार सानूने गायले असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. याच कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीला जबाबदार धरले होते.
मिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.