दिग्दर्शकाने लग्नाची घातली मागणी, नकार देताच सिनेमातून काढलं बाहेर, मीनाक्षी शेषाद्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 05:05 PM2024-06-03T17:05:28+5:302024-06-03T17:07:01+5:30

Meenakshi Sheshadri : बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने 'दामिनी' रिलीज झाल्यानंतर ३१ वर्षांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की शूटिंग दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी तिला कसे प्रपोज केले होते आणि लग्नाची ऑफर नाकारल्यानंतर तिला चित्रपट सोडावा लागला होता. मग घडलं असं काही.

Meenakshi Seshadri revealed that the director asked for marriage, was removed from the film as soon as he refused | दिग्दर्शकाने लग्नाची घातली मागणी, नकार देताच सिनेमातून काढलं बाहेर, मीनाक्षी शेषाद्रीचा खुलासा

दिग्दर्शकाने लग्नाची घातली मागणी, नकार देताच सिनेमातून काढलं बाहेर, मीनाक्षी शेषाद्रीचा खुलासा

मीनाक्षी शेषाद्री या एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये अनेक दमदार व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला राजकुमार संतोषी यांचा 'दामिनी'. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला वाईट अनुभव आला होता, हे तुम्हाला माहीत आहे का! अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मीनाक्षीने खुलासा केला की राजकुमार संतोषीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तिला चित्रपटातून वगळण्यात आले. तिने सांगितले की अशा परिस्थितीतही ती कशी गप्प राहिली आणि शेवटी, प्रोड्यूसर्स गिल्डच्या पाठिंब्यामुळे तिला पुन्हा चित्रपटात सामील होण्याची संधी मिळाली.

झूमवर बोलताना मीनाक्षी शेषाद्री म्हणाल्या की, 'राजकुमार संतोषी जी आणि मी याविषयी न बोलण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट आता जुनी झाली आहे. पण धैर्याने उभे राहणे महत्त्वाचे होते, कारण हे कोणालाही सांगायचे नव्हते. मी गप्प राहून ते हाताळले. मी फक्त एवढेच म्हणाले होते की मी यावर भाष्य न करायचे ठरविले, कारण याला भांडणात रूपांतरित करणे माझ्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. ही लढाई नाही.

ती पुढे म्हणाली की, माझा ज्यावर विश्वास असतो त्यासाठी मी ठाम राहते आणि जर गोष्टी ठीक होणार असतील तर आम्ही एक टीम मिळून काम करेन. हाच तो संदेश होता जो मी चित्रपटातील लोकांना आणि प्रेक्षकांना देऊ इच्छिते. मी एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी तिथे होती आणि 'दामिनी' हा नक्कीच तसा चित्रपट असणार होता.

'मी संतोषीजींचा आदर करते'
मीनाक्षीने तिला संपूर्ण प्रोड्युसर्स गिल्डने कसा पाठिंबा दिला याबद्दल सांगितले, 'मी चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाचा, विशेषत: संतोषीजींचा आदर करते, कारण त्यांची दृष्टी खूप चांगली होती. शेवटी, ते म्हणतात की कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलतात, म्हणून प्रोड्यूसर्स गिल्ड, आर्टिस्ट गिल्ड, सर्वांनी मिळून हे शक्य केले.'

मीनाक्षीने हरीश म्हैसूरशी केले लग्न 
नंतर मीनाक्षीने १९९५ मध्ये हरीश म्हैसूरशी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. राजकुमार संतोषी यांनी मनीलाशी लग्न केले आणि राम आणि तनिषाचे पालक झाले. मीनाक्षी आणि राजकुमार संतोषी यांचा एकत्र पहिला चित्रपट घायाल (१९९०) होता. 'दामिनी'नंतर त्यांनी १९९६ मध्ये 'घातक'साठी पुन्हा एकत्र काम केले.

Web Title: Meenakshi Seshadri revealed that the director asked for marriage, was removed from the film as soon as he refused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.