तर सीबीडी ऑनलाईन मिळतेच कसे? प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राचा सवाल

By रूपाली मुधोळकर | Published: September 24, 2020 02:01 PM2020-09-24T14:01:32+5:302020-09-24T15:27:32+5:30

याबद्दल काही नियम का नाहीत?; ट्विट मीरा चोप्राने केले ट्विट

meera chopra raised question how is cbd oil freely available online if it is illegal | तर सीबीडी ऑनलाईन मिळतेच कसे? प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राचा सवाल

तर सीबीडी ऑनलाईन मिळतेच कसे? प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतची एक्स मॅनेजर जया साहा हिची अलीकडे एनसीबीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान जयाने श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते.

ड्रग्ज आणि बॉलिवूड यांचे कनेक्शन समोर आल्यानंतर ग्लॅमर इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान अशा अनेक टॉपच्या नट्या ड्रग्ज प्रकरणात फसल्या आहेत. या बड्या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा होतास प्रियंका चोप्राची  चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘सीबीडी ऑईल बेकायदेशीर आहे, भारतात बॅन आहे तर ते खुलेआम ऑनलाईन मिळते कसे? मी चेक केले, अ‍ॅमेझॉनवरही ते सहजपणे उपलब्ध आहे. याचा वापर बेकायदेशीर आहे तर याबद्दल काही नियम का नाहीत? असे ट्विट मीरा चोप्राने केले आहे.

श्रद्धा कपूरने सुशांत सिंग राजपूतची एक्स-मॅनेजर जया साहाकडून सीबीडी ऑईल मागवले होते, असा खुलासा झाला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने एनसीबीसमोर दिली आहे. या पार्श्वभूमीवर मीरा चोप्राने हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सीबीडी ऑईल म्हणजे काय?
 कॅनबिडिओल ((CBD) 1940 मध्ये निर्माण करण्यात आलेलं एक phytocannabinoid आहे. हे 113 annabinoids मधील एक आहे. भांग आणि गांज्याच्या झाडांमध्ये याचा वापर केला जातो. 2019 मध्ये सीबीडीवर एक क्लिनिकल रिसर्च करण्यात आला होता. अतिकाळजी, मूव्हमेंट डिसॉर्डर आणि वेदना यासाठी ड्रग्सचा वापर होत असल्याचा रिसर्चमध्ये उल्लेख होता. कॅनबिडिओल वेगवेगळ्या पद्धतीनं शरीरात घेतते जाऊ शकते. धूर, वाफ किंवा एरोजल स्प्रेच्या माध्यामातून किंवा तोंडावाटे घेतले जाते.

जयाने घेतले होते श्रद्धा कपूरचे नाव!

सुशांतची एक्स मॅनेजर जया साहा हिची अलीकडे एनसीबीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान जयाने श्रद्धा कपूरचे नाव घेतले होते. श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याचे तिने म्हटले होते. श्रद्धा कपूरशिवाय तिने सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वत:साठी सीबीडी ऑईल मागवल्याचा खुलासाही तिने केला होता. यापूर्वी ईडीने रिया चक्रवर्ती आणि जया साहा यांच्यात झालेल्या ड्रग्जबाबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा खुलासा केला होता. ज्यामध्ये जयाने रियाला सुशांतच्या चहा किंवा कॉफीमध्ये काही थेंब टाकण्याचा सल्ला दिला होता. चहामध्ये 4 थेंब घाल आणि त्याला ते प्यायला दे. 30-40 मिनिटांनी त्याचा परिणाम दिसून येईल, असा मॅसेज जयाने रियाला केला होता. नंतर या दोघींमध्ये सीबीडी ऑईलसंदर्भात ही चर्चा झाल्याचे समोर आले होते.

श्रद्धा कपूरसाठी खरेदी केले होते सीबीडी ऑईल, जया साहाने NCB समोर केले कबुल

म्हणे, ड्रग्ज ने बना दी जोडी...; ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव समोर येताच रणवीर सिंग झाला ट्रोल

Web Title: meera chopra raised question how is cbd oil freely available online if it is illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.