भेटा, ‘मेरी प्यारी बिंदू’मधील अभिमन्यूला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 11:05 AM2016-05-12T11:05:59+5:302016-05-12T16:35:59+5:30

आयुष्यमान खुराणा व परिणीत चोपडा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे शूटींग आजपासून कोलकात्यात सुरु झाले. आयुष्यमान या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साहित आहे. याच उत्साहाच्या भरात त्याने एक या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Meet Abhimanyu in 'My lovely point'! | भेटा, ‘मेरी प्यारी बिंदू’मधील अभिमन्यूला!

भेटा, ‘मेरी प्यारी बिंदू’मधील अभिमन्यूला!

googlenewsNext
ुष्यमान खुराणा व परिणीत चोपडा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे शूटींग आजपासून कोलकात्यात सुरु झाले. आयुष्यमान या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साहित आहे. याच उत्साहाच्या भरात त्याने एक या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या चित्रपटात आयुष्यमान अभिमन्यू रॉय या लेखकाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. शुभ्र धोती-कुर्ता, जुना टाईपरायटर आणि गरम गरम चहा हेच कोलकात्याच्या रस्त्यांवर मोठा झालेल्या अभिमन्यू रॉयचे विश्व. याचठिकाणी अभिमन्यू रॉयच्या लेखणीतून बिंदू उर्फ परिणीती चोपडा हिची कथा लिहिली जाते. यात परिणीती एका महत्त्वाकांक्षी गायिकेच्या रूपात दिसणार आहे. यशराज बॅनरखाली अक्षय रॉय दिग्दर्शित या चित्रपटातील अभिमन्यू रॉयला भेटायचेय? तर मग पाहा, हा व्हिडिओ...
  

Web Title: Meet Abhimanyu in 'My lovely point'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.