भेटा, अक्षय कुमारच्या अतरंगी चाहत्याला ; अक्कीला भेटायला आला होता हरिद्वारहून सायकलवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2017 05:56 AM2017-01-21T05:56:04+5:302017-01-21T11:31:01+5:30
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी चाहते अतरंगी हरकती करत असतात. कुणी सेटवर सेलिब्रिटीचा पाठलाग करतात, कुणी निनावी पत्रं पाठवतात. मात्र, ...
आ ल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी चाहते अतरंगी हरकती करत असतात. कुणी सेटवर सेलिब्रिटीचा पाठलाग करतात, कुणी निनावी पत्रं पाठवतात. मात्र, ‘बॉलिवूडचा खिलाडी’ असलेल्या अक्षय कुमारचा एक चाहता अत्यंत अतरंगी असल्याचं कळतंय. हा चाहता अक्कीला भेटण्यासाठी हरिद्वारहून मुंबईला थेट सायकलवरून आला. मात्र, अक्षयने त्या चाहत्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून सर्व चाहत्यांना आवाहन केले आहे की, ‘मला भेटण्यासाठी कुणीही असे पाऊल उचलू नये. यामुळे तुमच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.’
बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अक्षय कुमारने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. बॉक्स आॅफिसवर अनेक चित्रपट हिट ठरले आणि काहींनी तर रेकॉर्डब्रेक कमाई देखील केली. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या चाहतावर्गात भर पडतांना दिसत आहे. खरंतर, अक्षय कुमारला त्याच्या चाहत्यावर्गाशी सातत्याने संवाद साधायला प्रचंड आवडतं. त्यासाठी तो सोशल मीडियावर नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असतो. आता हेच पाहा ना, थेट हरिद्वारहून हा त्याचा चाहता अक्षयला भेटण्यासाठी मुंबईत आला. यावरून त्याचे ‘फॅन फॉलोर्इंग’ हे किती जबरदस्त आहे, हे लक्षात येते. मात्र, या चाहत्यासोबत झालेली त्याची भेट अक्कीला बिल्कुल पसंत पडली नाही. त्याने इन्स्टाग्रामवरून सर्व चाहत्यांना विनंती केली आहे की,‘अशाप्रकारचे प्रयोग कुणीही करू नये. तुमच्यासाठी ते हानीकारक ठरू शकते. ’
एका सर्व्हेनुसार, अक्षय कुमार हा २०१६ चा सर्वांत ‘महागडा’ अभिनेता असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अलीकडेच त्याच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस त्याने पत्नी टिवंकल खन्ना हिच्यासोबत सेलिब्रेट केला. २०१७ मध्ये अक्षय कुमारचे ‘जॉली एलएलबी’,‘रोबोट’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत.
Also Read :
* लग्नाच्या सोळाव्या वाढदिवशी अक्षयकुमार-ट्विंकल खन्ना एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा!
* OMG! अक्षय कुमारसोबत लग्न करण्याआधी ट्विंकल खन्नाचा झाला होता दोनदा साखरपुडा