ही अभिनेत्री आहे प्रतीक गांधीची पत्नी, साराभाई, खिचडी या मालिकांमध्ये केले आहे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:55 PM2021-04-15T17:55:05+5:302021-04-15T17:56:26+5:30

प्रतीकची पत्नीदेखील अभिनेत्री असून तिने साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Meet Bhamini Oza, beautiful wife of 'Scam 1992' actor Pratik gandhi | ही अभिनेत्री आहे प्रतीक गांधीची पत्नी, साराभाई, खिचडी या मालिकांमध्ये केले आहे काम

ही अभिनेत्री आहे प्रतीक गांधीची पत्नी, साराभाई, खिचडी या मालिकांमध्ये केले आहे काम

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतीकची पत्नीदेखील अभिनेत्री असून तिचे नाव भामीनी ओझा गांधी आहे.

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. यामुळे एक चेहरा अचानक लोकांच्या डोळ्यांत भरला. तो म्हणजे, हर्षद मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता प्रतीक गांधी याचा.
देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या आणि सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये प्रतीक गांधीने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचा दमदार अभिनय पाहून चाहते त्याच्या प्रेमात पडले.

प्रतीकची पत्नीदेखील अभिनेत्री असून तिचे नाव भामीनी ओझा गांधी आहे. तिने साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी, ना बोले तुमने मैंने कुछ कहाँ, एक पॅकेट उम्मीद यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला 2012-13 मध्ये ब्रेन ट्युमर झाला होता. पण तिने या आजारावर मात केली. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव मीराया आहे.

प्रतीकने 2004 मध्ये गुजराती नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘युअर्स इमोशनली’ या इंग्रजी चित्रपटातही तो झळकला. गुजराती रंगभूमी गाजवणाऱ्या प्रतिकने 2014 साली ‘बे यार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मोहन नो मसालो, हू चंद्रकांत बक्षी यांसारख्या नाटकांमध्ये प्रतिकने साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. राँग साइड राजू, व्हेंटिलेटर, मित्रों , लवयात्री या चित्रपटांमध्ये त्याला भूमिका मिळाल्या आणि या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले.

मूळचा सूरतचा असलेला प्रतीक इंजिनिअर आहे. पुढे सेल्सपर्सन म्हणूनही त्याने काम सुरु केले आणि सोबत सोबत नाटक, लाईव्ह शो करू लागला. इंजिनिअर झालेल्या आपल्या मुलाने मोठ्या पगाराची नोकरी करावी, अशी खरे तर प्रतीकच्या कुटुंबाची इच्छा होती. पण प्रतीकने मी अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करणार, असे घरच्यांना स्पष्ट सांगितले. केवळ सांगितले नाही तर 2016 मध्ये इंजिनीअरिंगची नोकरी सोडून तो पूर्णवेळ अ‍ॅक्टिंग करू लागला.

Web Title: Meet Bhamini Oza, beautiful wife of 'Scam 1992' actor Pratik gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.