अमिताभ बच्चनची नात नव्या नवेलीला डेट करतोय मिजान? जावेद जाफरीने सांगितले सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 11:15 AM2021-02-08T11:15:02+5:302021-02-08T11:15:28+5:30
मिजान जाफरी आणि अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली यांच्या अफेअरच्या सध्या जोरात आहेत. पण या चर्चेत किती तथ्य आहे?
अभिनेता जावेद जाफरी याचा मुलगा मिजान जाफरी आणि अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली यांच्या अफेअरच्या सध्या जोरात आहेत. पण या चर्चेत किती तथ्य आहे, याचे उत्तर आता खुद्द जावेद जाफरीने दिले आहे.
अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा काही वर्षांपूर्वी एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या नवेली तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत असलेला मिस्ट्री बॉय मात्र मीडियाच्या कॅमे-यांसमोर आपला चेहरा लपवतांना दिसला होता. चक्क स्वत:च्या टी-शर्टने चेहरा लपवतानाचे त्याचे नव्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. पण चेहरा लपवलेला नव्याचा हा मित्र कोण? हे मात्र उघड झाले नव्हते. पण शेवटी मीडियापासून लपवता लपत नाही. नव्यासोबतचा मीडियाला पाहून चेहरा लपवणारा तो मिस्ट्री बॉय दुसरा कुणी नसून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान होता.
आता अभिनेता जावेद जाफरीने मिजान व नव्याच्या अफेअरच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत जावेदने मिजान व नव्याच्या अफेअरच्या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘ लोक मैत्रीचा वेगळाच अर्थ काढतात. मिजान व नव्याचे कॉमन फ्रेन्ड आहेत. लोकांना कन्टेंट पाहिजे असतो. अशात मैत्रीचा अर्थही काहीतरी वेगळाच काढला जातो. नव्या व मिजान सोबतच मोठे झालेत. माझी मुलगी आणि नव्या शाळेत असतानापासूनच चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यांचे खूप कॉमन फ्रेंडही आहेत. सारा अली खान आणि मिजानदेखील एकाच शाळेत शिकत होते. ती घरी आल्यावर रात्री 3 वाजेपर्यंतही हे लोक सोबत असायचे. त्यांना लिंकअप करणे सोपे आहे.’
मिजाननेदेखील नव्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांचे फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. मागच्याच महिन्यात मिजानला बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार मिळाल्यानंतर नव्याने त्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवला होता. तर, याआधीही नव्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर मिजानने केलेली कमेंट पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.