बिग बींच्या आधी माजी पंतप्रधान राजीव गांधींना या सिनेमाची मिळाली होती ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:15 PM2020-03-03T13:15:00+5:302020-03-03T13:15:00+5:30
राजकारणात येण्यापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना या चित्रपटाची मिळाली होती ऑफर
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ७०च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक रोल केले आहेत. त्यातील त्यांचे बरेचसे चित्रपट व भूमिका सुपरहिट ठरल्या आहेत.
३ मार्च, १९७२ साली अमिताभ बच्चन यांचा बॉम्बे टू गोवा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून बिग बींना हिरो म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळालं. आज हा चित्रपट रिलीज होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
बॉम्बे टू गोवा चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी आधी राजीव गांधी यांना विचारले होते. द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना बॉम्बे टू गोवा चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. राजीव यांनी ही ऑफर नाकारली. यामागे त्यांचे खासगी कारण होते.
द हिंदूशिवाय या प्रसंगाचा उल्लेख हनीफ जावेरी यांच्या 'अ मैन ऑफ़ मैनी मूड्स' पुस्तकात केले आहे. या पुस्तकात म्हटलंय की, मेहमूद यांनी नशेमध्ये या चित्रपटाची ऑफर राजीव गांधी यांना दिली होती. त्यावेळी राजीव गांधी अमिताभ बच्चन यांच्या मदतीसाठी मेहबूब यांच्याकडे गेले होते. पण मेहबूब यांनी राजीव गांधी यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. ही गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी मित्र होते.
बॉम्बे टू गोवा त्याकाळातील सुपरहिट चित्रपट होता. त्यानंतर या चित्रपटाचे बरेच रिमेकही रिलीज झाले. साऊथ रिमेकसोबत विजय राज व राजू श्रीवास्तव अभिनीत याच शीर्षकाचा आणखीन एक सिनेमा २००७ साली प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळाला नाही.