भूमी-रकुलची ऑफस्क्रीन केमिस्ट्री; 'गोरी है कलाइयॉं' गाण्यावर शेअर केली मजेशीर रील, अर्जुननेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:23 IST2025-02-11T16:20:57+5:302025-02-11T16:23:18+5:30

लवकरच 'मेरे हसबंड की बिवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

mere husband ki biwi fame actress bhumi pednekar and rakul preet singh offscreen chemistry shared a funny reel on the gori hai kalaiyan song | भूमी-रकुलची ऑफस्क्रीन केमिस्ट्री; 'गोरी है कलाइयॉं' गाण्यावर शेअर केली मजेशीर रील, अर्जुननेही दिली साथ

भूमी-रकुलची ऑफस्क्रीन केमिस्ट्री; 'गोरी है कलाइयॉं' गाण्यावर शेअर केली मजेशीर रील, अर्जुननेही दिली साथ

Mere Huband Ki Biwi Starcast Video: अर्जुन कपूर (Arjun Kapoor), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) स्टारर 'मेरे हसबंड की बिवी' हा  येत्या २१ फेब्रुवारीला म्हणजेच अवघ्या चार दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. शिवाय गाणी देखील चर्चेत आली आहे. 'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. त्यामुळे या चित्रपटात वेगळं काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने त्यातील कलाकार सुद्धा प्रसिद्धीझोतात आले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.


नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर त्यांच्या ऑफस्क्रीन धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये भूमीसह रकुल प्रीत सिंग आणि सोबतीला अर्जुन कपूरसुद्धा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये भूमी आणि रकुल मेरे हसबंड की बिवी मधील गोरी है कलाइयां गाण्यावर डान्स करत आहेत. तर शेवटी अर्जुन कपूरची देखील झलक पाहायला मिळतेय. "We are Obbessed..."असं कॅप्शन भूमीने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. 

अलिकडेच 'मेरे हसबंड की बिवी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर पाहिल्यामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.'मेरी हसबंड की बिवी'मध्ये कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर अनेक दिवसांनी अर्जुन कपूर प्रेक्षकांना रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 

Web Title: mere husband ki biwi fame actress bhumi pednekar and rakul preet singh offscreen chemistry shared a funny reel on the gori hai kalaiyan song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.