'मेरे हसबंड की बीवी' मधील 'सावरियॉं जी' गाणं रिलीज; अर्जुन, भूमी अन् रकुलची अफलातून केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:02 IST2025-02-18T16:57:26+5:302025-02-18T17:02:45+5:30

'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे.

mere husband ki biwi movie new song sawariya ji released starring arjun kapoor bhumi pednekar and rakul preet singh  | 'मेरे हसबंड की बीवी' मधील 'सावरियॉं जी' गाणं रिलीज; अर्जुन, भूमी अन् रकुलची अफलातून केमिस्ट्री

'मेरे हसबंड की बीवी' मधील 'सावरियॉं जी' गाणं रिलीज; अर्जुन, भूमी अन् रकुलची अफलातून केमिस्ट्री

Mere Husband Ki Biwi New Song: अर्जुन कपूर, (Arjun Kapoor), (Bhumi Pednekar) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) हे त्रिकूट 'मेरे हसबंड की बिवी' या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोम-कॉम चित्रपटाची सध्या बरीच चर्चा होताना दिसतेय. अलिकडेच मेरे हसबंड की बिवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. याशिवाय चित्रपटातील गाणी सुद्धा ट्रेंडिंगवर होती. दरम्यान, मेरे हसबंड की बिवी मधील गोरी है कलाईयॉं या गाण्यानंतर आणखी एक नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सिनेमाप्रेमींच्या पसंतीस उतरलं आहे.


नुकतंच 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'सावरिया जी' असं नव्या गाण्याचं नाव असून सध्या ट्रेंड होतं आहे. या गाण्यात अर्जुन, भूमी आणि रकुलमधील अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. सोहेल सेन आणि वर्षा सिंह धनोआ यांनी 'सावरिया जी' या गाण्याला आपला आवाज दिला आहे. पूजा फिल्म्सद्वारे सोशल मीडियावर या गाण्याची झलक दाखवण्यात आली आहे. "प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं...,", असं कॅप्शन देत सोशल मीडियावर या गाण्याचा शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाची निर्मिती पूजा फिल्म्सने केली आहे. तर मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'लव्ह ट्रँगल नही फूल सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. 

Web Title: mere husband ki biwi movie new song sawariya ji released starring arjun kapoor bhumi pednekar and rakul preet singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.