Met Gala 2019: प्रियंका चोप्राचा लूक पाहून कुणी म्हटले व्रिकम वेताळ, कुणी म्हटले भूतनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:13 AM2019-05-07T11:13:45+5:302019-05-07T14:06:37+5:30

‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर दोघांनीही स्टनिंग अवतारात एन्ट्री घेतली. पण हे काय? प्रियंकाचा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला.

Met Gala 2019 Priyanka Chopra’s Look: Funny Desi Memes and Jokes Take Over the Internet | Met Gala 2019: प्रियंका चोप्राचा लूक पाहून कुणी म्हटले व्रिकम वेताळ, कुणी म्हटले भूतनी!

Met Gala 2019: प्रियंका चोप्राचा लूक पाहून कुणी म्हटले व्रिकम वेताळ, कुणी म्हटले भूतनी!

googlenewsNext
ठळक मुद्दे काहींना प्रियंकाचा हा लूक आवडला पण अनेक जण प्रियंकाचा हा अवतार पाहून थक्क झालेत. मग काय अनेकांनी प्रियंकाचा लूक पाहून खिल्ली उडवणे सुरु केले.

2017 मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियका चोप्रा आणि निक जोनास पहिल्यांदा भेटले होते. याच रेड कार्पेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि पुढे दोघेही पती-पत्नी झालेत. साहजिकच, हा इव्हेंट प्रियंका व निक दोघांसाठीही खास आहे. यंदा याच खास इव्हेंटमध्ये प्रियंका व निक पुन्हा एकदा जोडीने दिसले. ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर दोघांनीही स्टनिंग अवतारात एन्ट्री घेतली. पण हे काय? प्रियंकाचा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला.


 सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियंकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते.  या गाऊनमध्ये प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. पण  या गाऊनसोबत प्रियंकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियंकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही. 

तिची हेअर स्टाईल, त्यावरचा क्राऊन हे सगळेच चर्चेचा विषय ठरले.  पिंक आणि शिमरी रंगाचा मेकअप आणि पांढºया रंगाच्या आईब्रो पाहून प्रियंकाचा हा लूक क्षणात व्हायरल झाला नसेल तर नवल. काहींना प्रियंकाचा हा लूक आवडला पण अनेक जण प्रियंकाचा हा अवतार पाहून थक्क झालेत. मग काय अनेकांनी प्रियंकाचा लूक पाहून खिल्ली उडवणे सुरु केले. काहींनी तिला व्रिकम बेताल म्हटले तर कुणी कार्टून. कुणी निक अगदी प्रियंकाचा ‘वेटर’ दिसतोय,असे लिहित त्यांची खिल्ली उडवली. काही युजर्सनी तर चक्क प्रियंकाचा हा लूक पाहून तिला ‘भूतनी’ संबोधले. एकंदर काय तर प्रियंकाचा हा लूक अनेक चाहत्यांना आवडला नाही. पाहुयात चाहत्यांच्या काही मजेदार प्रतिक्रिया...
 







 

Web Title: Met Gala 2019 Priyanka Chopra’s Look: Funny Desi Memes and Jokes Take Over the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.