#MeToo : गायिका सोना मोहपात्रानंतर आणखीन एका गायिकेने केले कैलाश खेरवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:16 AM2018-10-17T10:16:56+5:302018-10-17T10:17:27+5:30
मीटू मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर सोना मोहपात्रा आणि एका महिला फोटो जर्नालिस्टने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनंतर आणखी एका गायिकेने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.
मीटू मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर सोना मोहपात्रा आणि एका महिला फोटो जर्नालिस्टने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनंतर आणखी एका गायिकेने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. वर्षा सिंग धनोवा असे या गायिकेचे नाव आहे.
वर्षा सिंग धनोवाने एएनआयकडे कैलाश खेरबद्दलचा आपला अनुभव यावेळी शेअर केला. २०१५ मध्ये दुबई एअरपोर्टवर मी पहिल्यांदा कैलाश खेर यांना भेटले. आम्ही एकत्र काही फोटो घेतले आणि एकमेकांचे फोन नंबरही घेतले. एके दिवशी कैलाश खेर यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवले. मला तुझे नाव आवडले आणि मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायला आवडेल, असे म्हणत कैलाश खेर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले आहे.
I used to idolise Kailash Kher. I met him for the first time at Dubai airport in 2015. We clicked some pictures, exchanged numbers & started texting. One day, he called me & asked me to meet. He said he likes my name & wants to make love to me: Singer Varsha Singh Dhanoa. #MeToopic.twitter.com/fL5KfDTj27
— ANI (@ANI) October 17, 2018
‘एका मुलाखतीदरम्यान कैलाश खेर माझ्या आणि माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीच्यामध्ये बसला होता व त्याचे हात सारखे आमच्या मांड्यांवरून फिरत होते,’ असा खुलासा या फोटो जर्नलिस्टने केला होता. या आरोपावर कैलाश खेर यांने खुलासाही केला होता. हे प्रकरण केव्हाचे आहे, मला आठवत नाही़ काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो, असे तो म्हणाला होता. केवळ इतकेच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांना मी कसा आहे, हे ठाऊक आहे, असा छातीठोक दावाही त्याने केला होता. सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा हिने कैलाश खेरवर गंभीर आरोप केले. ‘एका कॉन्सर्टच्या निमित्ताने मी कैलाशला पृथ्वी कॅफेमध्ये भेटले होते. आमच्या बँडने ताल धरला होता आणि नेहमीप्रमाणे कैलाशचा हात माझ्या मांडीवर होता. हात तसाच ठेवत, तू खूप सुंदर आहेस. बरे झाले तू कुण्या अभिनेत्याला न भेटता, एका सिंगरला(सोनाचा पती रामला उद्देशून) भेटलीस, असे तो मला म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून मी लगेच तिथून निघून गेले, असे सोना मोहपात्राने लिहिले आहे.