#MeToo : अखेर अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या परिक्षकपदावरून पायऊतार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:13 PM2018-10-21T14:13:41+5:302018-10-21T14:14:03+5:30
‘अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या पॅनलमध्ये यापुढे नसतील. त्यांच्या अनुपस्थित शो सुरू राहणार असून नेहा कक्कड व विशाल ददलानी हे या शो जज करतील,’ असे सोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरतर्वनाचे आरोप झेलणारे संगीतकार अनु मलिक यांना अखेर ‘इंडियन आयडल 10’च्या परिक्षकपदावरून पायऊतार व्हावे लागले. होय, सोनी एंटरटेनमेंटने ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. ‘अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या पॅनलमध्ये यापुढे नसतील. त्यांच्या अनुपस्थित शो सुरू राहणार असून नेहा कक्कड व विशाल ददलानी हे या शो जज करतील,’ असे सोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Anu Malik is no longer a part of Indian Idol jury panel. The show will continue its planned schedule & we'll invite some of the biggest names in Indian music as guests to join Vishal&Neha to judge extraordinary talent of Indian Idol season 10: Sony Entertainment Television #MeToopic.twitter.com/uJmEK1cq4X
— ANI (@ANI) October 21, 2018
अनु मलिक यांच्यावर आत्तापर्यंत चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. सर्वप्रथम गायिका श्वेता पंडित हिने अनु मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर गायिका सोना मोहपात्रा हिनेही अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला. पाठोपाठ अन्य दोन महिलांनीही अनु मलिकविरोधात आवाज उठवला. मात्र, दोघींनीही नावे जाहीर केलेली नाहीत.
‘अनू मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर ते माज्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली, असा एका महिलेचा आरोप आहे.अनु मलिक यांच्यावर दुसरा आरोप करणारी महिला इंडियन आयडलच्या काही वर्षांपूर्वीच्या भागाची स्पर्धक राहिली आहे.
अनु मलिक ‘इंडियन आयडल’चे दहावे सीझन जज करत होते. पण लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर त्यांना या पदावरून हटवावे, यासाठीचा दबाव वाढला होता. या दबावानंतर सोनी टीव्हीने अनु मलिक यांना ‘इंडियन आयडल 10’च्या परिक्षकपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अनु या शोमध्ये दिसणार नाहीत.