तर अनुरागला थेट कोर्टात खेचले असते...! रिचा चड्डाने ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर
By रूपाली मुधोळकर | Published: September 23, 2020 02:18 PM2020-09-23T14:18:02+5:302020-09-23T14:18:48+5:30
पायलने अनुरागवर गंभीर आरोप केलाच शिवाय अभिनेत्री रिचा चड्डा हिलाही या वादात ओढले.
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला आहे. पायलने अनुरागवर गंभीर आरोप तर केलाच शिवाय अभिनेत्री रिचा चड्डा हिलाही या वादात ओढले. रिचा यामुळे संतापली होती आणि यानंतर तिने थेट पायल घोषला कायदेशीर नोटीस पाठवले होते. तेव्हापासून रिचाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर काहीजण रिचाचा सपोर्ट करत आहेत तर काही तिला ट्रोल करत आहेत. अर्थात ट्रोल करणा-यांना रिचाने सणसणीत उत्तर दिले आहे.
तर अनुरागला कोर्टात खेचले असते...
— TheRichaChadha (@RichaChadha) September 22, 2020
ट्रोलर्सला उत्तर देताना रिचाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ‘अनुराग बकवास गोष्टी केल्या असत्या तर मी त्याला लीगल नोटीस नाही तर थेट कोर्टात खेचले असते. तुझे मत तुझ्याजवळ ठेव. मी घाबरणा-यांपैकी नाही़ तिने (पायल घोष) बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कायदेशीर कारवाई करणारच आणि तू (ट्रोलरला उद्देशून) फार डरकाळ्या फोडू नकोस. तुझा प्रत्येक मॅसेज माझ्या केसला आणखी मजबूतच बनवणार,’ असे रिचाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
काय म्हणाली होती पायल घोष
अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करताना रिचा व हुमा कुरेशी, माही गिल यांना या वादात गोवले होते. अनुरागवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करताना पायलने या सर्वांची नावे घेतली होती. अनुरागच्या सांगण्यावरून हुमा, रिचा आणि माही गिल काहीही करायला तयार होतात, असा दावा पायलने केला होता.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले.
पायल म्हणाली, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले. त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला. मी तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.’
तापसी पन्नू म्हणाली - 'जर अनुराग कश्यप लैंगिक अत्याचारात दोषी आढळला तर....'
SEE PICS : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?