#MeToo: काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो; गैरवर्तनाच्या आरोपावर कैलाश खेरचा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 11:40 AM2018-10-09T11:40:04+5:302018-10-09T11:40:53+5:30
एका महिला फोटो जर्नालिस्टने कैलाश खेरवर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता कैलाश खेरने स्पष्टीकरण दिले आहे.
एका महिला फोटो जर्नालिस्टने कैलाश खेरवर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. आपल्या अन्य एका महिला साथीदारासोबत ही महिला फोटोग्राफर कैलाश खेरची मुलाखत घ्यायला गेली होती, तेव्हाची ही घटना असल्याचा तिचा दावा आहे.
‘कैलाश खेर आम्ही दोघींच्यामध्ये बसला होता आणि मुलाखत देताना सतत त्याचा हात आमच्या मांडीवर होता. कैलाशच्या मुलाखतीत या घटनेचाही उल्लेख कर, असे मी माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीला म्हटले होते. पण वृत्तपत्र या अँगलची बातमी छापणार नाही, असे तिचे म्हणणे होते,’ असे ट्विट या पीडित महिला फोटो जर्नलिस्टने केले होते. या सगळ्या प्रकरणावर आता कैलाश खेरने स्पष्टीकरण दिले आहे. हे आरोप ऐकून प्रचंड निराशा झाली. मी पाटण्यात होतो आणि मला माझ्यावरच्या या आरोपांबाबत कळले. ही घटना कधीची आहे, हे मला आठवत नाही. माझे स्वत:चे एक छोटे जग आहे आणि मी माझ्या या जगात बिझी असतो. पण तरिही कुणाला काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो. जे लोक मला ओळखतात, माझ्यासोबत ज्यांनी काम केले आहे, त्यांना मी माणुसकी किती जपतो, हे माहित आहे. मी महिलांचा प्रचंड आदर करतो. विशेषत: मीडियात काम करणाऱ्या महिलांचा. कारण त्यांचे काम किती कठीण आहे, हे मी जाणतो, असे कैलाश खेरने म्हटले आहे.
(2) #MeToo
— Natasha Hemrajani (@radiantbear) October 6, 2018
I was sent with my colleague, a woman journalist, to take pictures of Kailesh Kher at his home for an interview. During the interview, this creep sat between us as close to us as he could. He also kept putting his hands on our thighs (on the skin above our skirts)
कैलाश खेरवर गैरवर्तनाचे आरोप करणाºया फोर्टा जर्नलिस्टने मॉडेल जुल्फी सैय्यद याच्यावरही आरोप केले आहेत. ‘क्रूज लाईनरवर मी माझ्या काही पत्रकार मित्रांसोबत गेले होते, यावेळी मी माझा फोन चार्जिंगला लावायला जुल्फीच्या रूममध्ये गेले असता, त्याने मला बळजबरीने किस करणे सुरू केले. याची तक्रार करायला हवी, असे मी सोबतच्या जर्नलिस्टला म्हटले. पण तुझे हे आरोप कुणीच छापणार नाही, असे मला सांगण्यात आले. अर्थात दुस-्या दिवशी जुल्फीने झालेल्या कृत्यासाठी माझी माफी मागितली, असे तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते.