#MeToo : आत्महत्येचा प्रयत्न करणारा बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर अनिर्बन बलाहवर आणखी एक आरोप!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:21 PM2018-10-21T18:21:39+5:302018-10-21T18:22:01+5:30
दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, हृतिक रोशन अशा बड्या स्टार्सचा मॅनेजर अनिर्बन बलाह याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.
दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, हृतिक रोशन अशा बड्या स्टार्सचा मॅनेजर अनिर्बन बलाह याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ‘वजह तुम हो’ या चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा उमर हिने अनिर्बनवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मी काम मिळवण्यासाठी अनिर्बनशी संपर्क केला होता. त्याने मला भेटायला बोलवले. मी त्याला भेटायला गेले. या भेटीत मी तुला स्टार बनवणार, मोठ मोठ्या मॅगझिनवर तुझे फोटो छापणार, असे काय काय आश्वासने दिलीत. सोबतचं पूर्ण वेळ मला सेक्ससाठी उत्तेजित करत राहिला, असे मीरा उमरने एका मुलाखतीत सांगितले आहे.
अनिर्बनवर आधीच चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. याचमुळे अलीकडे अनिर्बनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अनिर्बन हा बॉलिवूडचा टॉपचा टॅलेंट मॅनेजर म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत चार तरूणींनी त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. यापैकी एका अभिनेत्रीने अनिर्बनवर गंभीर आरोप केलेत. ‘कास्टिंग बेडरूममध्ये होते, सार्वजनिक स्थळी नाही,’ असे अनिर्बन आपल्याला म्हणाल्याचे तिने म्हटले आहे.
या आरोपानंतर KWAN एंटरटेनमेंटने अनिर्बनला आपल्या कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (अनिर्बन हा लीडिंग टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी KWAN एंटरटेनमेंटचा फाऊंडर होता.) याशिवाय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेही अनिर्बनला आपल्या फाऊंडेशनमधून बडतर्फ केल्याचे कळतेय. अनिर्बन हा दीपिकाच्या द लिव्ह लव्ह लाफ या मेंटल हेल्थ फाऊंडेशनचा बोर्ड मेंबर होता. या फाऊंडेशनमध्ये तो सल्लागार सदस्य म्हणून काम करत होता. सूत्रांचे मानाल तर फाऊंडेशनने आपल्या बोडार्तून अनिर्बनचे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाने डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर या फाऊंडेशनची स्थापना केली होती. या सगळ्या प्रकारानंतर अनिर्बनने अलीकडे मुंबईच्या वाशी पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ऐनवेळी पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले.