#MeToo: कंगना राणौतपाठोपाठ ‘क्वीन’च्या आणखी एका अभिनेत्रीचा विकास बहलवर गैरवर्तनाचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 10:32 AM2018-10-09T10:32:11+5:302018-10-09T10:35:10+5:30

अभिनेत्री कंगना राणौतने विकास बहलवर खळबळजनक आरोप केलेत. तिच्यापाठोपाठ आता ‘क्वीन’ चित्रपटातील आणखी एका अभिनेत्री विकास बहलवर गैरतर्वनाचा आरोप केला आहे.

#MeToo: Queen's Nayani Dixit Accuses Vikas Bahl of Sexual Misconduct | #MeToo: कंगना राणौतपाठोपाठ ‘क्वीन’च्या आणखी एका अभिनेत्रीचा विकास बहलवर गैरवर्तनाचा आरोप!

#MeToo: कंगना राणौतपाठोपाठ ‘क्वीन’च्या आणखी एका अभिनेत्रीचा विकास बहलवर गैरवर्तनाचा आरोप!

googlenewsNext

हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. काल-परवा एका महिलेने दिग्दर्शक विकास बहल याच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले. या महिलेच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना राणौत मैदानात उतरली. तिनेही विकास बहलवर खळबळजनक आरोप केलेत. तिच्यापाठोपाठ आता ‘क्वीन’ चित्रपटातील आणखी एका अभिनेत्री विकास बहलवर गैरतर्वनाचा आरोप केला आहे.
‘क्वीन’मध्ये कंगनाच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नयनी दीक्षित हिने विकास बहलच्या ‘रंगेल’ कृत्यांचा खुलासा केला आहे. एका ताज्या मुलाखतीत तिने विकास बहलवर अनेक आरोप केलेत. ‘क्वीन’चे शूटींग सुरु असताना विकासने एकदा अचानक माझा हात पकडला. त्याचे ते वागणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुन्हा असे करशील तर तिथेच मार पडेल, असे मी त्याला त्याक्षणीचं सुनावले. दुसऱ्या दिवशी त्याने माझा नेमका सूड उगवला. दुस-या दिवशी सेटवर लहान लहान गोष्टींसाठी तो माझ्यावर ओरडू,खेकसू लागला. एकदा मी आणि विकास बहल एका २ स्टार हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये थांबलो होतो. हॉटेलची रूम मला आवडली नव्हती. मी विकासला याबद्दल सांगितले तर, त्याने चक्क मला रूम शेअर करण्याची आॅफर दिली. तुला तुझी रूम आवडली नसेल तर माझ्यासोबत माझ्या रूममध्ये थांब, असे तो मला म्हणाला. त्याचा इशारा मी समजली होती. ‘क्वीन’मधील लंडन ठुमकता या गाण्याच्या शूटींगवेळी विकास बहल दिल्लीच्या एका मुलीसोबतही असाच फ्लर्ट करत होता. ती मुलगी त्याच्या या वागण्याने घाबरली होती. काही वेळानंतर ती मुलगी माझ्याजवळ आली आणि तिने मला सगळे सांगितले. यानंतर मी कंगनालाही सांगितले, असे नयनी हिने सांगितले.

Web Title: #MeToo: Queen's Nayani Dixit Accuses Vikas Bahl of Sexual Misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.