#MeToo : ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’च्या निर्मात्यांनी विक्की सिदानासोबत तोडले संबंध!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 09:10 PM2018-10-24T21:10:55+5:302018-10-24T21:11:22+5:30
मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री कृतिका शर्मा कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्की सिदानाला आपल्या चित्रपटातून बाहेर केले आहे.
मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री कृतिका शर्मा कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदानावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी विक्की सिदानाला आपल्या चित्रपटातून बाहेर केले आहे.
‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या चित्रपटातून सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूर बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज बुधवारी एक स्टेटमेंट जारी करत, विक्की सिदानाला चित्रपटातून निलंबित करण्यात आल्याचे जाहिर केले.
‘स्टुडिओ5 एलिमेंट्स महिलांना सुरक्षित, स्वस्थ वातावरण देण्यास कटिबद्ध आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या कुठल्याही दोषीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. एक प्रॉडक्शन हाऊस या नात्याने आमचा ‘मीटू’ला पूर्ण पाठींबा आहे. त्यामुळे आम्ही या मोहिमेअंतर्गत आरोप झेलणा-या कुठल्याही व्यक्तिसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही विक्की सिदानासोबत काम करणार नाही, ’ असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृतिकाने सुमारे पाच वर्षांपूवीर्ची एक घटना शेअर केली होती. २०१३ मध्ये एका आॅडिशनदरम्यान कृतिका विक्कीला भेटली होती.
‘आॅडिशनसाठी माझी निवड झाल्यावर मला बोलवण्यात आले़ सगळे काही अचानक झाल्याने मला माझे तिकिट बुक करण्यास व राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले गेले. मी तिकिट बुक केले. पण राहण्यासाठी मला विक्की सिदानाच्या कार्यालयाची मदत घ्यावी लागली. मुंबईला पोहोचल्यावर मी विक्कीच्या कार्यालयात गेले. पण मदत करण्याऐवजी विक्कीने मला पाहताच प्रश्न केला. मी तुझी मदत केली तर तू मला काय देशील, असा त्याचा प्रश्न होता. यानंतर एका मीटींगच्या बहाण्याने तो मला एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेला आणि एका फ्लॅटमध्ये पोहोचताच दरवाजा बंद करून मला त्याने अचानक धक्का देत बेडवर पाडले आणि माझ्यासोबत बळजबरी करू लागला, मी त्याला विनंत्या केला. मी तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आले, असे काय काय मी त्याला ओरडून ओरडून सांगितले. शेवटच्या क्षणाला त्याला काय वाटेल माहित नाही, पण तो थांबला आणि आॅटो कर अन् निघ, तुझी फ्लाईट आहे, असे तो मला म्हणाला. यानंतर मी तडक आॅटो पकडून एअरपोर्टकडे निघाले,’ असे कृतिकाने सांगितले होते. ही आपबीती सांगताना ती भावूक झाली होती. दरम्यान विक्की सिदानाने कृतिकाचे सर्व आरोप खोडून काढले होते.