#MeToo : विकी कौशलचे वडिल श्याम कौशलही ‘मीटू’च्या जाळ्यात, दोन महिलांनी केले गैरवर्तनाचे आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:04 AM2018-10-15T10:04:04+5:302018-10-15T10:05:25+5:30

अभिनेता विकी कौशल याचे वडिल आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल हेही ‘मीटू’ मोहिमेच्या वावटळीत सापडले आहेत.

#MeToo: vicky kaushal father sham kaushal accused of sexual misconduct by two womens | #MeToo : विकी कौशलचे वडिल श्याम कौशलही ‘मीटू’च्या जाळ्यात, दोन महिलांनी केले गैरवर्तनाचे आरोप!

#MeToo : विकी कौशलचे वडिल श्याम कौशलही ‘मीटू’च्या जाळ्यात, दोन महिलांनी केले गैरवर्तनाचे आरोप!

googlenewsNext

अभिनेता विकी कौशल याचे वडिल आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर श्याम कौशल हेही ‘मीटू’ मोहिमेच्या वावटळीत सापडले आहेत. दोन महिलांनी श्याम कौशल यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत, सोशल मीडियावर आपली आपबीती सुनावली आहे.
नमिता प्रकाश या महिलेने श्याम कौशलविरोधात एक पोस्ट लिहिली आहे. नमिताने ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’, ‘अब तक 56’,‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ यासारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.



 2006 मध्ये आऊटडोअर शूटदरम्यान श्याम कौशल यांनी वोडका पिण्यासाठी मला आपल्या खोलीत बोलवले. अनेकदा नकार देऊनही त्यांनी आग्रह करून मला वोडका पिण्यास भाग पाडले. यानंतर फोनवर पॉर्न फिल्म दाखवू लागले. यानंतर मी कशीबशी रूममधून बाहेर पडले, असा आरोप नमिताने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.



नमिताशिवाय अन्य एका महिलेनेही श्याम कौशलवर गंभीर आरोप केले आहेत. श्याम वारंवार मॅसेज करून मला त्यांच्या खोलीत बोलवत. मी नकार दिल्यावर त्यांनी सेटवर माझी खिल्ली उडवण्यास सुरूवात केली,असे या महिलेने म्हटले आहे.
या दोन्ही प्रकरणात अद्याप श्याम कौशल यांच्याकडून कुठलाही खुलासा आलेला नाही. मीटू मोहिमेत आत्तापर्यंत अनेकांवर गैरवर्तनाचे, लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. यात साजिद खान, नाना पाटेकर, विकास बहल, आलोक नाथ, लव रंजन, पियुष मिश्रा, सुभाष घई, रजत कपूर, कैलाश खेर आदींचा समावेश आहे.

Web Title: #MeToo: vicky kaushal father sham kaushal accused of sexual misconduct by two womens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.