#MeToo: आलोकनाथ यांच्याविरोधात विनता नंदा यांची पोलिसात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 07:02 PM2018-10-17T19:02:48+5:302018-10-17T19:04:12+5:30
दिग्दर्शक-लेखिका विनता नंदा यांनी अभिनेता 'संस्कारी बाबूजी' अर्थात आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता विनता यांनी त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
दिग्दर्शक-लेखिका विनता नंदा यांनी अभिनेता 'संस्कारी बाबूजी' अर्थात आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता विनता यांनी त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.
विनता यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सूत्रांनुसार, विनता यांचा तक्रार अर्ज स्वीकारला असून चौकशी केल्यानंतर आलोकनाथांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले जात आहे. या प्रकरणावर विनता नंदा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ओशिवरा पोलिसांनी माझी तक्रार स्वीकारली आहे. आता पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. मला मंगळवारी संध्याकाळी मानहानी प्रकरणी नोटीस मिळाली आहे. माझे वकील यासंदर्भात काम करत आहेत. ते सध्या दिंडोशी न्यायालयात आहेत.
Oshiwara police have accepted my complaint, now the due process has to be followed. The defamation notice was served to me post office hours last night and my lawyers have worked over night. Right now they are in Dindoshi Court and are responding to it: Vinta Nanda #Metoopic.twitter.com/saWFLaW5Zt
— ANI (@ANI) October 17, 2018
पटकथा लेखिका आणि दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी कथितरित्या बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाबू’वर बलात्काराचा आरोप केला आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या एका ‘संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप १९९० मध्ये अपार लोकप्रीय झालेल्या ‘तारा’ या मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. विनता यांनी आपल्या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. पण त्यांचा रोख बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेत ‘संस्कारी बाबू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.