गौरीबद्दल शाहरुख खाननं मिका सिंहला आधीच दिली होती वॉर्निंग, काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:17 IST2025-03-02T16:16:55+5:302025-03-02T16:17:07+5:30
शाहरुख खानबद्दल मिकाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

गौरीबद्दल शाहरुख खाननं मिका सिंहला आधीच दिली होती वॉर्निंग, काय घडलं होतं?
Inside Mika Singh's home designed by Gauri Khan: बॉलिवूड आणि पंजाबी गायक मीका सिंह हा त्याचा मस्तमौला अंदाज, हटके आवाजामुळे ओळखला जातो. कायम वादामध्ये अडकलेला गायक म्हणूनही मीकानं त्याची ओळख निर्माण केली आहे. मीकानं बॉलिवूडबरोबर पंजाबी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. 'ऑंख मारे', 'राणी तू में राजा', 'आज की पार्टी' मिका सिंगची गाजलेली गाणी आजही पार्टी आणि कार्यक्रमांत वाजतात. सध्या तो 'पिंकविला'ला दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत. यातच शाहरुख खान आणि गौरी खान यांच्याबाबतीत मिकाने सांगितलेलं सत्य ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिका सिंहचे शाहरुख खान आणि गौरी खानसोबत चांगले संबंध आहेत. 'पिंकविला'शी बोलताना मिका सिंहने गौरी खानच्या कामाचे कौतुक केलं आहे. मिका सिंहने गौरीकडून त्याच्या ९९ व्या घराचे इंटीरियर करुन घेतलं आहे. पण, जेव्हा मिका सिंहनं गौरीकडून इंटीरियर करुन घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्याला शाहरुख खानने वार्निंग दिली होती. "गौरी तुला लुटेल, ती सर्व महाग करेल" असं शाहरुखनने मस्करीत मिका सिंहला म्हटलं होतं. पण, मिका सिंहला त्याच्या स्वप्नातील घर सजवण्यासाठी गौरकडून इंटिरेयर करुन घेतलं.
याबद्दल बोलताना तो म्हणाला, माझ्या घराचं इंटीरियर करण्याआधी गौरी वहिनींनी कुठलेही प्रश्न विचारायचे नाही अशी एक अट ठेवली होती. मीही त्यांच्या कामाचा आदर करत ती मान्य केली. मी नेहमीच बेज किंवा तपकिरी रंग वापरतो. तर गौरीने त्यात हा हिरवा सोफा ठेवला. पण, मी विश्वास ठेवला आणि अवघ्या दोन वर्षात माझं बदलेलं घर पाहून मी थक्क झालो", असं तो म्हणाला. यासोबतच त्याने गौरी आणि शाहरुखचे एवढं सुंदर घर बनवून दिल्याबद्दल आभार मानले.