मिलिंद-अंकिताचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले कपल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 16:57 IST2022-07-28T16:53:00+5:302022-07-28T16:57:22+5:30
मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते.

मिलिंद-अंकिताचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले कपल
मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर हे हटके कपल नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर या दोघांचे फोटोही सर्रास व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा हे ट्रेडिंग कपल चर्चेत आलं आहे. त्याला कारणही तसं खासच आहे. दोघेही एकमेकांसोबत सध्या क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत.
दोघेही सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.मिलिंद सोमणचा पत्नी अंकितासह अंडरवॉटर रोमान्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खुद्द मिलिंदनेच सोशल मीडियावर त्यांच्या दोघांचे अंडरवॉटर रोमान्सचे फोटो शेअर केले आहेच. यांत मिलिंद आणि अंकिता रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे.
मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते.दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिता लग्नबंधनात अडकले होते. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
मिलिंदप्रमाणेच आता अंकिताचीही वेगळी फॅन फॉलोइंग निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिचाही मोठा चाहता वर्ग आहे. अंकितासुद्धा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे.नित्यनियमाने तिचं वर्कआऊट ती करताना दिसते.मिलिंदप्रमाणेच अंकिताचाही फिटनेस फंडा पाहून चाहतेही तिचे कौतुक करताना दिसतात.