संपता संपेना या बॉलिवूड कपलचा रोमान्स, शेअर केलेत Kissing फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 10:49 AM2019-10-03T10:49:14+5:302019-10-03T10:53:23+5:30
मॉडेलिंग काळापासून मिलिंदवर अनेक तरुणी फिदा होत्या. त्याने जगभरातील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. ‘आयरन मॅन’ हा किताबही पटकावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमन आणि पत्नी कुंवर सोबत हे दोघेही हॉट कपल नेहमीचे सा-यांचे लक्ष वेधून घेत असतात. आधीच या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे नेहमीच या अजब कपलची गजब प्रेमकहाणी नेटीझन्सना आकर्षित करत असते. ५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक त्यामुळे यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची नेटीझन्स जरा जास्तच उत्सुक असतात. यांतच या दोघांचे सतत सोशल मीडियावर शेअर होणारे फोटोंमुळे नेहीमीच सा-यांचे लक्ष वेधून घेतात. आता पुन्हा त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोचीही प्रचंड चर्चा होत आहे. या फोटोलाही ब-याच कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. मिलिंदला त्याच्या फिटनेससाठी ओळखले जाते. तो नेहमीच लोकांमध्ये फिटनेसबाबत जनजागृती करताना दिसतो.
मात्र आता सतत मिलिंद आणि अंकिता बोल्ड फोटो शेअर करताना दिसतायेत. या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री तर आहेच. मात्र त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेल नाही. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, वय केवळ एक नंबर आहे. प्रेमात कसलेच बंधन नसते.
वेळात वेळ काढून हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असतात. नेहमीच या दोघांचे कधी ट्रेकिंगचे फोटो, व्यायाम करताना व्हिडीओ आणि फोटो तर कधी रनिंग रेस करताचे फोटो त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करत असतात. त्यांचे हे फोटो पाहून अनेक चाहते कमेंटस आणि लाईक्स करताना दिसतात.
मिलिंदने म्हटले होते की, ‘एक रिलेशनशिप दोन लोकांमध्ये असते. त्यामुळे मी कधीही वयाचा विचार केला नाही. मग ते रिलेशनशिप असो वा फिटनेस असो. मॉडेलिंग काळापासून मिलिंदवर अनेक तरुणी फिदा होत्या. त त्याने जगभरातील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर त्याने ‘आयरन मॅन’ हा किताबही पटकावला आहे. मिलिंदने अखेरीस सैफ अली खानच्या ‘शेफ’ या चित्रपटात काम केले होते.