इच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:16 PM2021-05-17T17:16:43+5:302021-05-17T17:17:52+5:30

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

Milind Soman could not donate plasma despite desire, find out the real reason behind this | इच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण

इच्छा असूनही मिलिंद सोमण करू शकला नाही प्लाझ्मा डोनेट, जाणून घ्या यामागचं खरं कारण

googlenewsNext


बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता तो कोरोनामुक्त झाला आहे. त्यानंतर त्याने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची इच्छा असूनही तो प्लाझ्मा डोनेट करू शकला नाही. त्याला हॉस्पिटलमधून घरी परत पाठवण्यात आले.


मिलिंद सोमण प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी हॉस्पिटलला गेला होता. मात्र त्याला हॉस्पिटलने नकार दिल्यामुळे माघारी फिरावे लागले. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, 'मी आज मुंबईत प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी गेलो होतो पण अॅण्टीबॉडीज खूप कमी होत्या. आपण निरुपयोगी असल्याची भावना मनात आली.'


त्याने पुढे सांगितले की, 'प्लाझ्मा थेरपी १०० टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले नसले तरी असे मानले जाते की याची खूप मदत होऊ शकते. त्यामुळे मला शक्य असेल ते करण्याचा माझा प्रयत्न होता. अॅण्टीबॉडीज कमतरतेचा साधारण अर्थ असा होतो की माझ्यात अत्यंत सौम्य लक्षणे आहेत आणि मी दुसर्‍या संसर्गाशी लढू शकतो परंतु इतर कोणत्याही व्यक्तीला मदत करू शकत नाही. त्यामुळे मी हताश झालो'


मिलिंद सोमणची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो मुंबईच्या बाहेर असलेल्या घरात राहत होता. यावेळी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हेल्थ अपडेट देत होता.

Web Title: Milind Soman could not donate plasma despite desire, find out the real reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.