‘सुपरफिट’ मिलिंद सोमणवर का आली सीटी स्कॅन करण्याची वेळ? वाचा काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:13 IST2021-09-06T14:12:43+5:302021-09-06T14:13:25+5:30
मिलिंद कायम त्याच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असतो. पण अलीकडे त्यानं असा एक फोटो शेअर केला की, तो पाहून चाहत्यांनाही धडकी भरावी...

‘सुपरफिट’ मिलिंद सोमणवर का आली सीटी स्कॅन करण्याची वेळ? वाचा काय आहे कारण
55 वर्षांचा मिलिंद सोमण (Milind Soman) बॉलिवूडचा सर्वात फिट अभिनेता आहे. भारतातच नाही तर जगभर त्याच्या फिटनेसची चर्चा होते. मिलिंद कायम त्याच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असतो. पण अलीकडे त्यानं असा एक फोटो शेअर केला की, तो पाहून चाहत्यांनाही धडकी भरावी. होय, मिलिंदने सीटी स्कॅन करतानाचा फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोमध्ये मिलिंद सीटी स्कॅन मशीनवर बसलेला दिसत आहे. आयर्नमॅनवर सीटीस्कॅन करण्याची वेळ का आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला. चाहत्यांच्या प्रश्नाला खुद्द मिलिंदनेच उत्तर दिलं.
होय, सगळं काही नॉर्मल आहे, असे त्याने स्पष्ट केले. ‘बेंगळुरूमध्ये सीटी स्कॅन झालं. ब्लॉकेज इत्यादी तपासलं गेलं. सगळं काही सामान्य आहे,’ असं त्यानं स्पष्ट केलं.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित स्क्रिनिंग करणं महत्त्वाचं आहेच. पण तुम्ही काय करता हेही महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या रोजच्या आहाराची योग्य सवय, नियमित व्यायाम, योग्य झोप शिवाय ताणतणावाचं व्यवस्थापनही तेवढंच महत्त्वाचं आहे, असं त्यानं लिहिलं.
झाला ट्रोल
मिलिंदने लोकांना जागृत करण्याच्या इराद्यानं ही पोस्ट केली होती. पण युजर्सनी यावरही दोन गोष्टी त्याला सुनावल्याच. तू सिटी स्कॅन प्रमोट करतोय. एक सीटीस्कॅन 100 एक्स-रेच्या बरोबर रेडिएशन देतो. सीटी स्कॅन काही रेग्युलर स्क्रिनिंग नाही. लोकांची दिशाभूल करू नकोस, असं एका युजरनं त्याला सुनावला. अन्य एका युजरने मिलिंदच्या या पोस्टला अतिशय बेजबाबदार पोस्ट म्हणत, आपला संताप व्यक्त केला.
अलीकडेच मिलिंदने मुंबईतील शिवाजी पार्क ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत 420 किमीची रनिंग पूर्ण केलं होतं. त्याला 8 दिवस लागले. या प्रवासाचा एक व्हिडिओ मिलिंदनं त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर देखील पोस्ट केला होता.