मिलिंद सोमणला पडलाय प्रश्न, घरातच राहून कसा झाला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 07:39 PM2021-03-27T19:39:59+5:302021-03-27T19:42:33+5:30

मिलिंदच्या चाहत्यांनाच नव्हे तर त्याला देखील कोरोना झाल्यानंतर आता धक्का बसला आहे. घरातच राहून कोरोना कसा झाला असा प्रश्न मिलिंदला पडला आहे.

milind soman said i am finding answer how i got infected by corona virus | मिलिंद सोमणला पडलाय प्रश्न, घरातच राहून कसा झाला कोरोना

मिलिंद सोमणला पडलाय प्रश्न, घरातच राहून कसा झाला कोरोना

googlenewsNext
ठळक मुद्देमिलिंदने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्याला कोरोना झाला असल्याचे सांगितले होते आणि आता त्यानेच एक पोस्ट शेअर करत त्याला कोरोना कसा झाला हा त्याला प्रश्न पडला असल्याचे म्हटले आहे.

मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्यांच्या फिटनेसचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचे फॅन्स देखील त्याचे हे व्हिडिओ फॉलो करत असतात. मिलिंद प्रचंड फिट असल्याने त्याला कोरोना झाल्यावर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. 

मिलिंदच्या चाहत्यांनाच नव्हे तर त्याला देखील कोरोना झाल्यानंतर आता धक्का बसला आहे. घरातच राहून कोरोना कसा झाला असा प्रश्न मिलिंदला पडला आहे. मिलिंदने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्याला कोरोना झाला असल्याचे सांगितले होते आणि आता त्यानेच एक पोस्ट शेअर करत त्याला कोरोना कसा झाला हा त्याला प्रश्न पडला असल्याचे म्हटले आहे.

मिलिंदने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 18 मार्चला मी दिल्लीहून परतलो. त्यावेळी माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह होती. त्या दिवसानंतर मी घरातूनच काम करत होतो. केवळ सकाळी धावायला जात होतो. अथवा दिवसभर घरातच असायचो. 23 तारखेला मला थोडेसे अशक्त वाटत होते. मला 98 डिग्री ताप होता आणि माझे डोके दुखत होते. मी बाहेरगावी जाताना दरवेळा कोरोना टेस्ट करत असतो.

मी 4 सप्टेंबरला पहिली टेस्ट केली. त्यानंतर आतापर्यंत मी 30 वेळा कोरोना टेस्ट केली आहे. मी या दरम्यान यूएसला जाऊन आलो. तसेच प्रत्येक विमान प्रवासाच्यावेळेला टेस्ट करत आहे. मी सरकारचे कोरोनाविषयक सगळे नियम पाळतो. तरी मला कोरोना कसा झाला हा प्रश्न मला पडला आहे.

 

Web Title: milind soman said i am finding answer how i got infected by corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.