मिलिंद सोमणसोबत त्याची ८१ वर्षांची आई मारतेय दोरीच्या उड्या, पाहा हा प्रेरणादायी व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 11:21 AM2020-04-22T11:21:29+5:302020-04-22T11:22:33+5:30
मिलिंदने त्याच्या आईसोबतचा हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण फिटनेससाठी ओळखला जातो. त्याचे देशभरात खूप चाहते आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षातदेखील तो अशी एक्सरसाईज करतो की जी पाहून तरुण वर्गदेखील चक्रावून जातात. पण सध्या त्याच्यापेक्षा त्याची आई सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. मिलिंद सोमणची आई उषा सोमण या ८१ वर्षांच्या असून त्या चांगल्याच फिट आहेत. मिलिंदच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. त्या कधी सुनेसोबत लंगडी घालताना दिसतात तर कधी मिलिंदसोबत मॅरेथॉनमध्ये धावतात, एवढेच नव्हे तर त्या मिलिंदसोबत पुश अप्स देखील करताना दिसतात. त्यामुळे सध्या मिलिंद किंवा त्याची पत्नी अंकितापेक्षा त्याची आई सोशल मीडियावर हिट आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
It's never too late.
— Milind Usha Soman (@milindrunning) May 12, 2019
Usha Soman, my mother.
80 years young.#mothersday#love#mom#momgoals#fitwomen4fitfamilies#fitness#fitnessmotivation#healthylifestyle#fitterin2019#livetoinspire make every day mother's day!!!!! 😃😃😃 pic.twitter.com/7aPS0cWxlR
मिलिंदने त्याच्या आईसोबतचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याची आई आणि तो दोरीच्या उड्या मारताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले आहे की, माझ्या आईसोबत मी दोरीच्या उड्या मारत आहे. तिच्यासाठी दोरीच्या उड्या मारणे हे काही नवीन नाहीये. पण माझ्यासाठी ही नवीन गोष्ट आहे. पण ज्यावेळी तुम्ही दिवसभर घरीच असता, त्यावेळी तुम्ही एकमेकांकडून काहीतरी शिकवण्याची गरज आहे. तुम्ही वृद्ध झालात असे तुमच्या मनाला वाटते, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही म्हातारे होता असे मला वाटते.
मिलिंद आणि त्याच्या आईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सोशल मीडियावर सध्या याच व्हिडिओची चर्चा आहे. मिलिंदने पोस्ट केल्यानंतर काहीच वेळात हजारोहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तुझी आई तुझ्यासारखीच असून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे असे अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.