फिट असूनही तुला कोरोना कसा झाला या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:01 PM2021-04-24T19:01:56+5:302021-04-24T19:04:02+5:30

मिलिंदने कोरोनावर मात केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत सांगितले आहे.

Milind Soman's Reply To Those Who Asked How He Contracted COVID-19 "If He's So Fit" | फिट असूनही तुला कोरोना कसा झाला या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर

फिट असूनही तुला कोरोना कसा झाला या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देमिलिंदने कोरोनावर मात केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने कोरोनावर मात केली असल्याचे सांगितले होते.

मिलिंद सोमणने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्या एका 40 वर्षांच्या मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. माझ्यासाठी हे प्रचंड धक्कादायक आहे. मला देखील सोशल मीडियावर अनेकजण विचारत आहेत की, तुम्ही इतके फिट असूनही तुम्हाला कोरोनाची लागण कशी झाली. त्यावर मी त्यांना एकच सांगतो की, तुम्ही फिट आहात म्हणून तुम्हाला कोरोना होणार नाही असे नाहीये... पण तुम्ही फिट असल्याने तुम्ही त्यावर लवकर मात देऊ शकता...

मिलिंदने कोरोनावर मात केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मिलिंदने एका काढ्याची रेसिपी देखील पोस्ट केली होती. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते की, क्वारंटाइनच्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी सांगत आहे. मी कोथिंबीर, मेथीचे दाणे, काळी मिरी, तुळस, आलं आणि गूळ याचा काढा घेतला होता. पहिल्या आठवड्यामध्ये मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. या व्यतिरिक्त मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका...


 

Web Title: Milind Soman's Reply To Those Who Asked How He Contracted COVID-19 "If He's So Fit"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.