"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?

By देवेंद्र जाधव | Updated: March 21, 2025 14:56 IST2025-03-21T14:55:30+5:302025-03-21T14:56:27+5:30

'छावा'च्या संपूर्ण प्रमोशनल इव्हेंटमध्ये अक्षय खन्ना कुठेच दिसला नव्हता. अशातच MIM नेत्यांनी अक्षय खन्नाची भेट घेऊन केेलेलं विधान चर्चेत आहे

mim politician waris pathan met akshaye khanna played aurangzeb in chhaava movie | "औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?

"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मण उतेकर (laxman utekar) दिग्दर्शित 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. 'छावा' सिनेमातील प्रत्येक भूमिका चांगलीच गाजली. 'छावा'मध्ये विकी कौशलने (vicky kaushal) साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लोकांना आवडली. याशिवाय अक्षय खन्नाने (akshaye khanna) साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेचीही प्रशंसा झाली. अशातच AIMIM चे वारिस पठाण (waris pathan) अक्षय खन्नाची भेट घेऊन त्याचं कौतुक केलंय. 'छावा'च्या रिलीजनंतर पहिल्यांदाच अक्षय समोर दिसला.

अक्षय खन्नाला भेटून वारिस पठाण काय म्हणाले?

AIMIM पार्टीचे नेते वारिस पठाण यांनी अक्षय खन्नाची भेट घेतली. यावेळी अक्षय टीशर्ट आणि जीन्स अशा साध्या पेहरावात दिसून आला. 'छावा'च्या रिलीजनंतर प्रमोशन, इव्हेंट कुठेच हजेरी न लावलेला अक्षय यानिमित्ताने पहिल्यांदाच समोर आला. अक्षयला भेटून वारिस पठाण म्हणाले की, "आज छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाची भेट झाली. अक्षय खूप चांगला व्यक्ती आहे. जर 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका कोणी मुस्लिम अभिनेत्याने साकारली असती तर आतापर्यंत प्रकरण कुठच्या कुठे गेलं असतं."



अक्षय खन्नाच्या भूमिकेची चर्चा

'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरपासूनच अक्षय खन्नाच्या भूमिकेची चर्चा होती. अशातच 'छावा' सिनेमा रिलीज झाल्यावर अक्षय खन्नाच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. विकी कौशल आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाची जुगलबंदी सर्वांना आवडली. अनेक वर्षांनंतर वेगळ्याच भूमिकेत अक्षय खन्नाला बघितल्यावर सर्वच थक्क झाले. अशातच वारिस पठाण यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे 'छावा'नंतर अक्षय खन्ना प्रथमच समोर आला.

Web Title: mim politician waris pathan met akshaye khanna played aurangzeb in chhaava movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.