Mini Mathur: -म्हणून मी ‘खान’ आडनाव लावत नाही..., मिनी माथूरने इतक्या वर्षानंतर सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:51 PM2023-04-07T16:51:06+5:302023-04-07T16:52:25+5:30

Mini Mathur : मिनीने कबीर खानशी लग्न केलं. पण कबीरचं खान आडनाव कधीच लावलं नाही. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. पण मिनीने ‘मिनी माथूर’ या नावासोबतच राहणं पसंत केलं. असं का, आता २५ वर्षांनंतर मिनीने यामागील कारणाचा खुलासा केला आहे.

Mini Mathur reveals why she never added 'Khan' to her name | Mini Mathur: -म्हणून मी ‘खान’ आडनाव लावत नाही..., मिनी माथूरने इतक्या वर्षानंतर सांगितलं कारण

Mini Mathur: -म्हणून मी ‘खान’ आडनाव लावत नाही..., मिनी माथूरने इतक्या वर्षानंतर सांगितलं कारण

googlenewsNext

'बजरंगी भाईजान', 'एक था टायगर' सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खानची (Kabir Khan) पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री मिनी माथुर (Mini Mathur) सध्या चर्चेत आहे. २५ वर्षांपूर्वी मिनीने कबीर खानशी लग्न केलं. पण कबीरचं खान आडनाव कधीच लावलं नाही. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. पण मिनीने ‘मिनी माथूर’ या नावासोबतच राहणं पसंत केलं. असं का, आता २५ वर्षांनंतर मिनीने यामागील कारणाचा खुलासा केला आहे.  तिने ‘सायरस ब्रोचा’ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत मिनी बोलली.  

काय म्हणाली ती...
माझा नवरा कबीर खान यानेच मला नाव खान आडनाव न लावण्याचा सल्ला दिला होता. त्यामागे एक व्यावहारिक कारण होतं. आडनाव बदलल्यास मला माझी सर्व अधिकृत कागदपत्रे बदलून घ्यावी लागली असती.  त्यामुळे कबीरने मला आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला होता. माझ्यासाठी ते खूप सोपं होतं. कबीर खानशी लग्न करण्याआधीपासूनच माझी ओळख मिनी माथुर अशी होती, त्यामुळे मला त्याच्या नावाचा आधार तसाही नको होताच.  शिवाय, मी आडनाव बदलू नये, हे त्यानेच मला सांगतलेलं.  आडनाव बदलल्यावर बँक, पासपोर्ट या सगळ्या ठिकाणी नाव बदलावं लागेल आणि ही प्रक्रिया खूप किचकट असते.  कबीरने कधीच मला माझे नाव किंवा आडनाव बदलायला सांगितलं नाही आणि मला देखील माझं नाव बदलायचं नव्हतं. त्यामुळे आमच्यासाठी हा विषयच संपला होता. आम्ही कधीच त्यावर पुन्हा चर्चा केली नाही, असं ती म्हणाली.


 
मी नावासाठी लढलेय...
महिलांनी लग्नानंतरही त्यांचं मूळ नाव कायम ठेवलं पाहिजे, असं स्पष्ट मत तिने मांडलं. ती म्हणाली, मध्यभागी तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाशिवाय तुमची ओळख नाही, असं अनेकप्रसंगी विशेषत: सरकारी कामावेळी महिलांना सुचवलं जातं. पण मी त्यासाठीही लढले, मी कुठेच पतीचं किंवा वडिलांचं नाव लावत नाही. शाळेच्या फॉर्ममध्येही त्यांचं नाव न लावण्यासाठी सुद्धा मी भांडले होते. शाळेच्या फॉर्ममध्ये खरंच धर्माचा कॉलम गरजेचा आहे का? माझ्यासाठी खरंच पती किंवा वडिलांचं नाव इतकं गरजेचं आहे का? माझ्यामते अशी काहीही गरज नाही. मला वाटेल तेच नाव मी लावेन.

Web Title: Mini Mathur reveals why she never added 'Khan' to her name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.