'पानी फाउंडेशन'च्या कार्याची जल शक्ती मंत्रालयाने घेतली दखल, आमिर खानने मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:31 AM2020-09-10T11:31:16+5:302020-09-10T11:32:15+5:30
आमिर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाउंडेशन'द्वारे केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जल शक्ती मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानने आपल्या 'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून पाण्याच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावला आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे. हे फाउंडेशन महाराष्ट्रातील गावांमध्ये जल संरक्षण आणि वाटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते. या फाउंडेशनच्या उल्लेखनीय कार्याची दखल जल शक्ती मंत्रालयाने घेतली आहे. त्यानंतर आमिर खानने ट्विट करत जल शक्ती मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
आमिर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाउंडेशन'द्वारे करण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जल शक्ती मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी मंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिण्यात आले,"आज आम्ही 'पानी फाउंडेशन'च्या कार्याचा गौरव करत आहोत, ज्याची स्थापना प्रसिद्ध अभिनेता आमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांच्याद्वारे करण्यात आली आहे. ही एनजीओ महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये समृद्धी आणण्याचे कार्य करत आहे. या एनजीओद्वारे सुरू करण्यात आलेली 'सत्यमेव जयते वॉटर कप’ ही एक कौतुकास्पद मोहीम आहे.”
https://t.co/Xn5H9gyQbWpic.twitter.com/YO8EXdbS7X
— Aamir Khan (@aamir_khan) September 9, 2020
जल शक्ती मंत्रालयाचे आमिरने मानले आभार
पानी फाउंडेशनच्या कार्याची दखल घेतल्यामुळे आमिर खानने जल शक्ती मंत्रालयाचे आभार सोशल मीडियावर मानले. त्याने लिहिले की,"किरण आणि मी, आमच्या प्रयत्नांची दाखल घेतल्याबद्दल मी, पानी फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्यातर्फे जल शक्ति मंत्रालयाला धन्यवाद देऊ इच्छितो. महाराष्ट्रात दुष्काळाविरुद्ध या लोक-आंदोलनाला अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद. आमचे देणगीदार आणि या प्रयत्नांमध्ये योगदान देत या प्रवासाचा भाग राहिलेल्या प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या सहयोगाशिवाय हे शक्य नव्हते. आपल्या विनम्र शब्दांनी आम्हाला आशा आणि शक्ती प्रदान केली आहे. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये निरंतर कार्यरत असून महाराष्ट्रातील हजारो जल हीरोंसोबत काम करून आम्ही धन्य झालो आहोत. धन्यवाद"
आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल
आमिर खान सध्या आपला आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत करीना कपूर खान असून हा चित्रपट ख्रिसमस 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.