लग्न नणंदेचं पण चर्चा शाहिद कपूरची पत्नी मीराच्या साडीची, साडीची किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:57 PM2022-03-05T13:57:13+5:302022-03-05T14:04:34+5:30

शाहिद कपूरची बहीण सना कपूरचे नुकतेच लग्न झाले. पण या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने.

Mira kapoor wears 1 lakh 68 thousand rupees saree on shahid kapoors sister wedding | लग्न नणंदेचं पण चर्चा शाहिद कपूरची पत्नी मीराच्या साडीची, साडीची किंमत वाचून व्हाल थक्क

लग्न नणंदेचं पण चर्चा शाहिद कपूरची पत्नी मीराच्या साडीची, साडीची किंमत वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

शाहिद कपूरची बहीण सना कपूरचे नुकतेच लग्न झाले. सना ही पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. 2 मार्च रोजी त्यांचे लग्न झाले. या लग्नाची खूप चर्चा झाली होती, पण या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने. आपल्या नणंदेच्या लग्नात मीरा लाखो रुपयांची साडी नसून पोहोचली होती. मीरा व्हाईट रंगाची रितिका मिरचंदानीने डिझायन केलेली सारी नेसली होती. सोशल मीडियावर तिचे या साडीतले लग्नादरम्यानचे फोटोही व्हायरल झाले होते. नेमकी किती लाखांची साडी मीरा नेसली होती जाणून घेऊया.  

शाहिद कपूरची पत्नी मीराने नेसलेल्या साडीची किंमत 1 लाख 68 हजार रुपये होती. या साडीत मीरा खूपच सुंदर दिसत होती. तिने फार लाईट मेकअप केला होता. शाहिद आणि मीराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेत. शाहिदने काळा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. त्याचे बहिणीसोबतचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात तो आपल्या बहिणीला प्रेमाने मिठी मारताना दिसतोय.  सना ही त्याची सावत्र बहीण आहे आणि त्याचे त्याच्या बहिणीवरचे प्रेम पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. मीरा राजपूतची फॅशन तरीही लोकप्रिय आहे. तिची ड्रेसिंग खूप छान आहे.

शाहिद कपूरबद्दल बोलायचे झाले तर तो जर्सीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूरही दिसणार आहे. याशिवाय तो ब्लडी डॅडी आणि फर्जी या चित्रपटात दिसणार आहे. शाहिद कपूर यावर्षी डिजिटल डेब्यू करणार आहे.
 

Web Title: Mira kapoor wears 1 lakh 68 thousand rupees saree on shahid kapoors sister wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.