Star Wife Mira Rajput : 'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा; 'स्टार पती म्हणता का?' मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:10 IST2022-12-04T17:02:12+5:302022-12-04T17:10:35+5:30
अभिनेता शाहीद कपुर आणि त्याची पत्नी मीरा राजपुत बॉलिवुडमधलं फेमस कपल. मीरा शाहीदपेक्षा बरीच लहान आहे त्यामुळे लग्न चर्चेचा विषय बनला होता.

Star Wife Mira Rajput : 'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा; 'स्टार पती म्हणता का?' मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत
अभिनेता शाहीद कपुर आणि त्याची पत्नी मीरा राजपुत बॉलिवुडमधलं फेमस कपल. मीरा शाहीदपेक्षा बरीच लहान आहे त्यामुळे लग्न चर्चेचा विषय बनला होता. पण हे एकदम पॉवरफुल कपल आहे हे त्यांनी अनेकदा दाखवुन दिलं. मीरा फार थेट बोतले हे आपण अनेकदा ऐकलं असेलंच. आता पुन्हा मीराने एका मुलाखतीत विधान केलं आहे
काय म्हणाली मीरा राजपुत ?
शाहीद कपुर बॉलिवुडचा स्टार आहे. मात्र स्टार वाईफ असं म्हणलेलं मला आवडत नाही असे विधान मीराने एका मुलाखतीत केले आहे. ती म्हणाली, 'स्टार वाईफपेक्षाही माझी वेगळी ओळख आहे. पण तुमच्यावर स्टार वाईफ हाच शिक्का लागतो. याची मला प्रचंड चिड आहे.'
मीरा पुढे म्हणाली, 'स्टार वाईफ मुळे लोक खरी ओळख विसरुन जातात. मला हे ऐकायला आवडत नाही. स्टार किड्स आणि स्टार वाईफ म्हणले की मला प्रचंड चीड येते, मुळात याची व्याख्याच काय कळत नाही. जेव्हा एखादी अभिनेत्री स्टार असते तेव्हा तिच्या पतीला कधीच स्टार पती म्हणले जात नाही. हे शब्दच बॅन करायला हवे.'