मीरा राजपूतनं ऑर्डर केलं मोबाईल कव्हर, आलं काही भलतंच;  पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:05 AM2021-07-09T11:05:12+5:302021-07-09T11:07:40+5:30

मीरानं तिच्या मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. पण पार्सल उघडलं तेव्हा आलं भलतंच.

Mira Rajput ordered a mobile cover, something went wrong; Sharing the post said ... | मीरा राजपूतनं ऑर्डर केलं मोबाईल कव्हर, आलं काही भलतंच;  पोस्ट शेअर करत म्हणाली...

मीरा राजपूतनं ऑर्डर केलं मोबाईल कव्हर, आलं काही भलतंच;  पोस्ट शेअर करत म्हणाली...

googlenewsNext
ठळक मुद्दे2015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झाले.

ऑनलाईन फ्रॉडच्या घटना फक्त सामान्यांसोबतच घडतात, असा विचार तुम्ही करत असाल तर चूक आहे. कारण अगदी सेलिब्रिटीही यातून सुटलेले नाहीत. होय, बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput )अलीकडे अशाच ऑनलाईन फ्रॉडची शिकार ठरली. होय, खुद्द मीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
मीरानं तिच्या मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. पण पार्सल उघडलं तेव्हा आलं भलतंच. मीरानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या फ्रॉडची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. (Shahir Kapoor's wife Mira Rajput became a victim of fraud)

तर मीरानं तिच्या आयफोनसाठी एक महागडं कव्हर ऑर्डर केलं होतं. तिनं त्यासाठी ऑनलाईन पेमेंट देखील केलं.  तिनं जो फोटो पाहून कव्हर ऑर्डर केलं होतं त्याऐवजी तिला दुस-याच प्रकारचं कव्हर पाठवण्यात आलं.  हे कव्हर पाहून मीरा नाराज झाली. या कव्हरची क्वालिटी पाहिल्यानंतर मात्र तिचा पारा चढला. अतिशय खराब क्वालिटीच्या या कव्हरला तळाला एक भोक असल्याचं पाहून तर तिचं टाळकं फिरलं.  हे भोक बुझवण्यासाठी चक्क स्टिकर लावण्यात आलं होतं. आता ही एवढी मोठी फसवणूक झाल्यावर मीरा संतापली  अन् तिनं   सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला.

‘मला एका स्लिंग कव्हरची गरज होती. जेणेकरून मी बॅग न घेता मोबाईल जवळ बाळगू शकेल. एक जाहिरात पाहून मी हे फोन कव्हर ऑर्डर केलं होतं.  मिळालं हे खराब क्वालिटीचं प्लास्टिक. अशी फसवणूक होऊन बराच काळ झाला होता...,’ असं तिनं लिहिलं.
अर्थात ही पोस्ट करताना, तिनं फसवणूक करणा-या वेबसाईटचं नाव सांगितलं नाही. मीराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत, तिला वेगवेगळे सल्ले दिले आहेत. अनेकांनी तिला सायबर सेलकडे जाण्याचा सल्ला दिला. अनेकांनी आपले काही असेच अनुभवही शेअर केले.

2015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झाले. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला मीराचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. 

 

Web Title: Mira Rajput ordered a mobile cover, something went wrong; Sharing the post said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.