16 वर्षांत किती बदलला शाहिद कपूर? पत्नी मीराने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:26 PM2019-06-14T12:26:02+5:302019-06-14T12:26:13+5:30
बॉलिवूडच्या टॉप अॅण्ड पॉवरफुल कपलच्या यादीत एका जोडीचे नाव हमखास घेतले जाते, ती जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत.
बॉलिवूडच्या टॉप अॅण्ड पॉवरफुल कपलच्या यादीत एका जोडीचे नाव हमखास घेतले जाते, ती जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. शाहिद व मीरा दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मीरा तर शाहिदसाठी अक्षरश: वेडी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे शाहिदची प्रशंसा करताना ती जराही थकत नाही. अलीकडे मीराने शाहिदचा एक कोलाज शेअर केला आहे. यात मीराने 16 वर्षांपूर्वीचा शाहिद आणि आत्ताचा शाहिद अशी तुलना केली आहे.
‘16 ईअर चॅलेंज’, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. या फोटोत शाहिदचे दोन लूक आहेत. पहिला फोटो ‘इश्क विश्क’ या चित्रपटादरम्यानचा आहे तर दुसरा फोटो ‘कबीर सिंह’ या चित्रपटातला आहे.
मीराने हा फोटो शेअर करताच, चाहत्यांनी कमेंट करणे सुरु केले. शाहिदचा भाऊ ईशान खट्टर यानेही या फोटोवर ‘खेल खल्लास’ अशी कमेंट दिली. शाहिदच्या एका फिमेल फॅननेही यावर प्रतिक्रिया दिली. ‘16 ईअर चॅलेंज, पूर्वी तो आमचा होता आणि आता नेहमीसाठी तुझा आहे,’ असे तिने लिहिले.
एका चाहत्याने शाहिदचा हा फोटो पाहून, शाहिद अजिबात बदलला नाही. तो आधीसारखाच हँडसम दिसतोय, असे लिहिले.
शाहिद व मीराने 2015 मध्ये लग्न केले होते. दोघांनाही मिशा आणि झेन नावाची दोन मुले आहेत. शाहिदच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या तो ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २१ जूनला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात शाहिदसोबत कियारा अडवाणी लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट 2017 मध्ये आलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.