'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा झळकणार 'मेरे देश की धरती'मध्ये, सिनेमातून मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 01:34 PM2020-12-26T13:34:27+5:302020-12-26T13:35:07+5:30

'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा 'मेरे देश की धरती' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'Mirzapur' fame Divyendu Sharma to star in 'Mere Desh Ki Dharti' | 'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा झळकणार 'मेरे देश की धरती'मध्ये, सिनेमातून मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा

'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा झळकणार 'मेरे देश की धरती'मध्ये, सिनेमातून मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा

googlenewsNext

संपूर्ण देशात शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. यादरम्यान मिर्झापूर फेम अभिनेता दिव्येंदु शर्माचा आगामी चित्रपटदेखील शेतकऱ्यांच्या वाईट स्थितीवर भाष्य करतो. या चित्रपटाचे नाव आहे मेरे देश की धरती. या चित्रपटावर मागील वर्षापासून दिव्येंदु काम करत होता मात्र लॉकडाउनमुळे चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्याात आले होते. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 'कार्निवल मोशन पिक्चर्स'चा ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. २३ डिसेंबरला ‘शेतकरी दिना’च्या निमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती, फराझ यांचं दिग्दर्शन आणि विक्रम यांनी संगीत दिग्दर्शित केलेला 'मेरे देश की धरती' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे.


शेतकऱ्यांप्रती काहीतरी करण्याच्या उद्देशाने भारावलेले दोन इंजिनिअर्स तरुण आपल्या गावचा कसा कायापालट करतात याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती... देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केले आहे. दिव्यांदू शर्मा शिवाय चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर हे कलाकार दिसणार आहेत. 


या चित्रपटाबद्दल दिव्येंदु शर्माने बॉम्बे टाइम्सला सांगितले की, तुम्ही महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांच्या कथा ऐकल्या असाल, त्यांची दुर्दशा तुम्हाला माहित असेल. या चित्रपटाच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येला मी समजू शकलो आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांच्यासाठी बनलेल्या योजनेअंतर्गतचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. 


‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची असून कथा नील चक्रवर्ती यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांनी केले आहे. प्रोडक्शन डिझायनर संजॉय दासगुप्ता तर वेशभूषा सुचिता गुलेचा आहेत. लोव पाठक कार्यकारी निर्माता आहेत.

Web Title: 'Mirzapur' fame Divyendu Sharma to star in 'Mere Desh Ki Dharti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.