​‘मिस फ्रान्स’ आइरिस मितेनेयर ठरली ‘मिस युनिव्हर्स’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 06:38 AM2017-01-30T06:38:29+5:302017-01-30T12:14:06+5:30

भारतीय सौंदर्यवती रोश्मिता हरिमुर्थी हिच्यासह ८६ स्पर्धकांना मागे टाकत अखेर फ्रान्सची आइरिस मितेनेयर हिने ‘मिस युनिव्हर्स’ किताबावर स्वत:चे नाव ...

Miss France 'Miss France' as Iris Mittner | ​‘मिस फ्रान्स’ आइरिस मितेनेयर ठरली ‘मिस युनिव्हर्स’!

​‘मिस फ्रान्स’ आइरिस मितेनेयर ठरली ‘मिस युनिव्हर्स’!

googlenewsNext
रतीय सौंदर्यवती रोश्मिता हरिमुर्थी हिच्यासह ८६ स्पर्धकांना मागे टाकत अखेर फ्रान्सची आइरिस मितेनेयर हिने ‘मिस युनिव्हर्स’ किताबावर स्वत:चे नाव कोरले.  फिलिपाईन्समध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात २३ वर्षीय आइरिसने विजयी मुकूट पटकावला. या स्पर्धेत मिस हॅटी राक्वेल पेलिसीएर हिने दुसरे तर मिस कोलंबिया अँड्रिया तोवार हिने तिसरे स्थान पटकावले.
 


पॅरिसमध्ये राहणारी आइरिस ही डेंटलची विद्यार्थीनी आहे. या स्पर्धेत आइरिस ही सुरूवातीपासूनच एका दमदार स्पर्धकांत गणली गेली होती. सौंदर्य, आत्मविश्वास आणि बुद्धी या जोरावर तिने  ‘मिस युनिव्हर्स’चा ताज आपल्या नावावर केला. ‘मिस युनिव्हर्स’ बनल्यानंतर दातांच्या स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण करणे हे तिचे पहिले लक्ष्य राहणार आहे. आइरिसने इव्हिनिंग गाऊन, स्विम सूट आणि प्रश्नोत्तर अशा अनेक फेºया पार करत अंतिम फेरी गाठली.



फिलिपाईन्सची माजी ‘मिस युनिव्हर्स’ पिया वर्जबैच हिने तिच्या माथ्यावर विजयी ताज चढवला. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ही स्पर्धा भारतासाठी काहीशी खास होती. कारण या स्पर्धेसाठीच्या परिक्षकांच्या पॅनलमध्ये माजी ‘मिस युनिव्हर्स’ आणि बॉलिवूड अत्रिनेत्री सुश्मिता सेन हिचा समावेश होता.

भारताचा अपेक्षा भंग



तब्बल सतरा वर्षे उलटून गेलीत. गत १७ वर्षांपासून भारताकडे ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आलेला नाही. त्यामुळेच यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’ किताब आपल्याकडे येणार का, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले  होते. मात्र  भारतीयांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. रोश्मिता हरिमुर्थी हिने ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र ती शेवटच्या १३ स्पर्धकांमध्ये निवडून येऊ शकली नाही आणि ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आणण्याचे भारताचे स्वप्न भंगले. सन १९९४ साली सुश्मिता सेन हिने ‘मिस युनिव्हर्स’ किताब पटकावला होता. यानंतर सन २००० साली लारा दत्ताने ‘मिस युनिव्हर्स’चा मानाचा किताब आपल्या नावावर केला होता.


  

Web Title: Miss France 'Miss France' as Iris Mittner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.