Miss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:42 PM2021-05-17T12:42:40+5:302021-05-17T12:50:03+5:30

Miss Universe 2020 : ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे हे 69 वे वर्ष होते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली.

Miss Universe 2020 is Mexico's Andrea Meza , India's Adline Castelino finishes fourth | Miss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी

Miss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी

googlenewsNext
ठळक मुद्देअंतिम फेरीत ब्राझिलची जुलिया गामा, पेरुची जॅनक मसिट, भारताची अँडलिन कॅसलिनो आणि मेक्सिकोची एंड्रिया मेजा यांची जोरदार टक्कर झाली.

मिस युनिव्हर्स 2020’ ही जागतिक सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली आणि मेक्सिकोच्या एंड्रिया मेजा (Andrea Meza) हिने बाजी मारत ‘मिस युनिव्हर्स’चा ताज आपल्या नावे केला. याचसोबत मेक्सिकोने मिस युनिव्हर्स या किताबावर पाचव्यांदा आपले नाव कोरले. भारताची अँडलिन कॅसलिनो (Adline Quadros Castelino) ही थर्ड रनर-अप ठरली.  (Andrea Meza of Mexico becomes Miss Universe, India's Adline Quadros Castelino is Third Runner Up) 

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे हे 69 वे वर्ष होते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली. जगभरातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु यापैकी केवळ चारच तरुणींना अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली. अंतिम फेरीत ब्राझिलची जुलिया गामा, पेरुची जॅनक मसिट, भारताची अँडलिन कॅसलिनो आणि मेक्सिकोची एंड्रिया मेजा यांची जोरदार टक्कर झाली. परंतु ब्राझिल, पेरु आणि भारतावर मात करत मेक्सिकोने विजेता पदावर आपले नाव कोरले. एंड्रिया मेजाने मेक्सोकोला पाचव्यांदा मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवून दिला. सध्या एंड्रिया मेजावर संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अन् उत्तराने परिक्षक झालेत इम्प्रेस...
एंड्रिया मेजाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन प्रश्न विचारण्यात आला. जर तू आपल्या देशाची पंतप्रधान झालीस तर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी तू काय करशील? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर तिने दिलेले उत्तर ऐकून परिक्षकही प्रभावित झाले.
‘कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कुठल्याही योग्य असा मार्ग सापडलेला नाही. त्यामुळे सर्व प्रथम मी देशातील प्रत्येक नागरिकाचे प्राण कसे वाचतील याकडे लक्ष देईल.

आपली आरोग्य व्यवस्था देशातील प्रत्येकाकडे पोहोचते आहे की नाही? याकडे प्रामुख्याने लक्ष देईन. देशात लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही यासाठी काही उपाययोजना करेन. कारण लोक केवळ कोरोनामुळे नव्हे तर बेरोजगारीमुळेदेखील मरत आहेत. अन् अशा गोष्टी माज्या देशात होणार नाही याकडे मी विशेष लक्ष देईन,’ असे ती म्हणाली़. तिने  दिलेले हे उत्तर सर्व परिक्षकांना आवडले आणि एंड्रिया मेजा  मिस युनिव्हर्स ठरली.

Web Title: Miss Universe 2020 is Mexico's Andrea Meza , India's Adline Castelino finishes fourth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.