Miss Universe India 2024: गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला खिताब, १८ व्या वर्षीच मिळवला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:10 AM2024-09-23T11:10:35+5:302024-09-23T11:14:54+5:30
राजस्थानची राजधानी जयपूर येथे मिस यूनिव्हर्स २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं
मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ (Miss Universe India 2024) चा खिताब यंदा गुजरातच्या रिया सिंघा (Riya Singha) या सुंदरीने पटकावला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथे मिस यूनिव्हर्स २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०१५ ची मिस यूनिव्हर्स इंडिया ठरलेल्या उर्वशी रौतेलाने रियाच्या डोक्यावर क्राऊन घातला. रियाने आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली याचा तिच्या कुटुंबाला प्रटंड अभिमान वाटतो.
मिस यूनिव्हर्स २०२४ चा खिताब पटकावल्यानंतर रिया सिंघा प्रतिक्रिया देत म्हणाली, "आज हा खिताब पटकावल्यानंतर मी आपली आभारी आहे. हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे या खिताबासाठी मी नक्कीच पात्र आहे. तसंच याआधीच्या विजेत्यांमुळे मला प्रेरणा मिळाली." आता रिया मिस यूनिव्हर्स २०२४ साठी भारताचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. मेक्सिको येथे मिस यूनिव्हर्स स्पर्धा पार पडणार आहे. रियाने ५१ फायनलिस्टला मागे टाकत खिताब मिळवला.
१८ वर्षीय रिया सिंघा गुजरातची आहे. मॉडेल म्हणून तिने करिअरला सुरुवात केली. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. तिचे ४० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सौंदर्य आणि बोल्डनेसने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चाहत्यांची तिला नेहमीच पसंती मिळते.