​मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे भारतात जल्लोषात स्वागत !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 05:42 AM2017-11-26T05:42:19+5:302017-11-26T11:12:19+5:30

जगभरात भारताचे नाव लौकिक करणारी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर भारतात परतली आहे. शनिवारी रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास मुंबई ...

Miss World Manishi Chillar welcome to India! | ​मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे भारतात जल्लोषात स्वागत !

​मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे भारतात जल्लोषात स्वागत !

googlenewsNext
भरात भारताचे नाव लौकिक करणारी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर भारतात परतली आहे. शनिवारी रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर पोहचल्यावर मानुषीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मानुषीच्या आगमनापूर्वी विमानतळावर फॅन्स तिचे पोश्टर घेऊन बऱ्याच तासापासून उपस्थित होते. विशेष म्हणजे तिची एक झलक पाहावयास मिळावी म्हणून हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी हजर होते. विमानतळावर भारतीय परंपरेनुसार तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि मानुषीनेही आपल्या फॅन्सचे अभिवादन स्वीकार केले. 

manushi chhillar

मानुषी छिल्लर येत्या २८ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री सोनम कपूर आणि अदिती राव हैदरीसोबत हैदराबादमध्ये सुरु होणाऱ्या ‘वैश्विक उद्यमिता शिखर सम्मेलन’मध्ये सहभागी होणार आहे. अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दिग्गज सेलिब्रिटीदेखील सहभागी होणार आहेत.

manushi chhillar

हरियाणामध्ये राहणारी मानुषीने यावर्षी फेमिना मिस इंडियाचा अ‍ॅवॉर्डही जिंकला होता. त्यानंतर छिल्लरने चीनमध्ये आयोजित समारोहात जगातील विविध भागातील १०८ सुंदर महिलांना मागे टाकत मिस वर्ल्डचा अ‍ॅवॉर्ड आपल्या नावे केला आहे. प्रियांका  चोप्राच्या मिस वर्ल्ड बनण्याच्या १७ वर्षानंतर मानुषीने हा अ‍ॅवॉर्ड पटकावला आहे. मानुषी छिल्लर देशाची सहावी मिस वर्ल्ड आहे. याअगोदर रीता फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोपड़ा आदींना हा अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे.   
 
manushi chhillar

मानुषीचा जन्म ५ सप्टेंबर रोजी आसममध्ये झाला. उच्च शिक्षणासाठी तिने दिल्लीतील विद्यापीठात प्रवेश घेतला. जेव्हा मानुषी मिस इंडिया बनली होती, तेव्हा तिने मीडियाला सांगितले होते की, मी एका अशा परिवारातून आले आहे, ज्यांच्याकरिता मॉडलिंग हे पूर्णपणे नवे प्रोफेशन आहे. कारण माझा परिवार शिक्षणावर अधिक भर देत नाही. त्यामुळेच माझ्या परिवारातून मॉडलिंगच्या दुनियेत येणारी मी बहुधा पहिलीच महिला आहे. जेव्हा तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने संधी मिळाल्यास इंडस्ट्री ज्वॉइन करू असे म्हटले होते. 

Web Title: Miss World Manishi Chillar welcome to India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.