Video : 'लालबागचा राजा'च्या गर्दीत 'मिस वर्ल्ड' हरवली! दर्शनाविनाच माघारी परतण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:29 IST2023-09-27T13:29:05+5:302023-09-27T13:29:34+5:30
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. परंतु, दर्शनाविनाच मानुषीला माघारी फिरावं लागलं.

Video : 'लालबागचा राजा'च्या गर्दीत 'मिस वर्ल्ड' हरवली! दर्शनाविनाच माघारी परतण्याची आली वेळ
दरवर्षी गणेशोत्सवात नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. यंदाही अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. अनेक सेलिब्रिटींचे लालबागचा राजा दर्शनाचे व्हिडिओ समोर आले आहेत.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. परंतु, दर्शनाविनाच मानुषीला माघारी फिरावं लागलं. लालबागच्या राजाच्या गर्दीत मिस वर्ल्ड हरवली. त्यामुळे तिला बाप्पाचं दर्शनही घेता आलं नाही. लालबागचा राजा दरबारातील मानुषीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. वरिंदर चावला या पापाराझी पेजवरुन मानुषीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत मानुषी लालबागचा राजाच्या दरबारात गर्दीत अडकल्याचं दिसत आहे. भाविकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे मानुषीला लालबागचा राजाचं दर्शन घेता आलं नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, मानुषीने 'मिस वर्ल्ड २०१७'चा किताब नावावर केला होता. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटातून मानुषी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात तिने विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातही ती झळकली होती.