"मोदी भक्त" म्हणणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, म्हणाला, "मी काँग्रेसच्या काळातील चित्रपट..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:45 PM2023-10-10T15:45:15+5:302023-10-10T15:45:55+5:30
बायोपिकमध्ये काम केल्यामुळे अनेकदा अक्षयला ट्रोलही केलं जातं. तर काही वेळेस त्याला मोदी भक्त असंही म्हटलं गेलं आहे. मोदी भक्त म्हणणाऱ्यांना अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे.
बॉलिवूडचा खिलाडी कुमार बायोपिक हिरो म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमारने 'टॉयलेट : एक प्रेमकथा', 'मिशन मंगल', 'पॅडमॅन' यांसारख्या अनेक बायोपिकमधून रियल लाइफ हिरोंची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडली.आता 'मिशन रानीगंज' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमारने रियल लाइफ हिरो जसवंत गिल यांची भूमिका साकारली आहे. मिशन रानीगंजच्या निमित्ताने अक्षय अनेक ठिकाणी मुलाखतीही देत आहे.
बायोपिकमध्ये काम केल्यामुळे अनेकदा अक्षयला ट्रोलही केलं जातं. तर काही वेळेस त्याला मोदी भक्त असंही म्हटलं गेलं आहे. मोदी भक्त म्हणणाऱ्यांना अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, "'टॉयलेट : एक प्रेमकथा' चित्रपटामुळे काही लोक माझ्यावर स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करतात, हे खरं आहे. मी 'पॅडमॅन'मध्येही काम केलं आहे. पण, मी 'एअरलिफ्ट'सारख्या चित्रपटातही काम केलं आहे, याकडे कोणीही लक्ष देत नाही. ही घटना काँग्रेसच्या काळात घडली होती."
"एवढंच काय 'मिशन रानीगंज' हा चित्रपटही देशात काँग्रेसची सत्ता असताना झालेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. पण, या गोष्टीचा कोणी विचारच करत नाही. मला कोणती कथा आवडली तर मी चित्रपट करतो. एका चांगल्या विषयावर चित्रपट बनवला गेला आहे, एवढाच हा मुद्दा आहे," असंही पुढे अक्षय म्हणाला.
'मिशन रानीगंज' हा एक सत्य घटनेवर आधारित असलेला सिनेमा आहे.पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे कोळशाच्या खाणीत ६५ खाणकाम करणारे लोक अडकले होते. जसवंत गिल यांनी या ६५ लोकांचे प्राण वाचवले होते. तेव्हापासून ते कॅप्सूल गिल या नावाने ओळखले जाऊ लागले. या चित्रपटात अक्षयबरोबर परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे.