मिथिला पालकरनं दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला सुंदर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:08 IST2025-03-30T16:07:23+5:302025-03-30T16:08:04+5:30

अभिनेत्री मिथिला पालकरने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात.

Mithila Palkar Wishes Gudi Padwa 2025 Shares Beautiful Video | मिथिला पालकरनं दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला सुंदर व्हिडीओ

मिथिला पालकरनं दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला सुंदर व्हिडीओ

Mithila Palkar Gudi Padwa 2025: साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.  नवीन वर्षाचा दिवस असल्याने फक्त सर्वसामान्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्री मिथिला पालकरनेही तिच्या घरी गुढी उभारली आहे.

अभिनेत्री मिथिला पालकर हिने देखील गुडीपाडवा आणि उगादीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं घरातील गुढीसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती सुंदर मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. मिथिलाचे लाखो चाहते आहेत. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कोणत्याही लूकमध्ये ती चाहत्यांना अगदी सहज 'मोहिनी' घालते.


 मिथिलाला खरी ओळख तिच्या कप साँगमुळे मिळाली होती. हिची चाल तुरू तुरू या गाण्यावर तिने एक व्हिडिओ सादर केलेला जो रातोरात हिट झाला.  त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.मिथिलाने २०१४ साली 'माझा हनीमून' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर २०१५ साली तिने 'कट्टी बट्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलंमिथिलाच्या 'मुरांबा' या मराठी चित्रपटातील आणि 'कारवां' या हिंदी चित्रपटातील भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. 

मिथिलाला 'गर्ल इन द सिटी' मधून खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर मिथिलाला 'लिटिल थिंग्स'मध्ये दिसली. या वेबसिरीजने तिचं नशीब बदललं. तसेच मिथिला ही कंगना राणौत आणि इमरान खान यांच्या 'कट्टी बट्टी' या चित्रपटात दिसली होती. यानंतर मिथिला इरफान खान, दुल्कर सलमानसोबत 'कारवां', अभय देओलसोबत 'चॉपस्टिक' आणि काजोल आणि रेणुका शहाणेसोबत 'त्रिभंगा' या चित्रपटात झळकली होती. आता लवकरच ती 'भूत बंगला' (Bhoot Bangla) सिनेमात दिसणार आहे.मिथिला पालकर या चित्रपटात अक्षय कुमारच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मिथिला पालकरनेही चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे.

Web Title: Mithila Palkar Wishes Gudi Padwa 2025 Shares Beautiful Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.