मिथुन चक्रवर्तींची Ex पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:01 PM2024-11-04T13:01:35+5:302024-11-04T13:02:56+5:30

मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन झालं आहे. रविवारी(३ नोव्हेंबर) अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६८ वर्षांच्या होत्या.

Mithun Chakraborty ex wife Helena Luke passes away in America at the age of 68 | मिथुन चक्रवर्तींची Ex पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

मिथुन चक्रवर्तींची Ex पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन झालं आहे. रविवारी(३ नोव्हेंबर) अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६८ वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, अद्याप त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. 

हेलेना ल्यूक यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवलं होतं. आओ प्यार करे, दो गुलाब, साथ साथ अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या मर्द या सिनेमात त्या झळकल्या होत्या. या सिनेमामुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. हेलेना यांनी १९७९ साली मिथुन चक्रवर्तींशी लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत घटस्फोट होत त्यांचा संसार मोडला. 

मिथुन चक्रवर्तींशी घटस्फोटानंतर हेलेना यांना फार चांगले बॉलिवूड सिनेमे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी सिनेइंडस्ट्री सोडून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत त्या फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायच्या. एका मुलाखतीत त्यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं होतं. लग्नानंतर खूश नसल्यामुळे घटस्फोट घेत वेगळं झाल्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी योगिता बाली यांच्याबरोबर लग्न केलं. 

Web Title: Mithun Chakraborty ex wife Helena Luke passes away in America at the age of 68

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.