मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक, शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन; मनोरंजनक्षेत्रातून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 04:12 PM2023-07-07T16:12:44+5:302023-07-07T16:13:42+5:30

मिथुन यांचे वडील बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

Mithun Chakraborty s mother Santirani Chakraborty passed away grandson namakshi confirms | मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक, शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन; मनोरंजनक्षेत्रातून शोक व्यक्त

मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक, शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन; मनोरंजनक्षेत्रातून शोक व्यक्त

googlenewsNext

अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची आई शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे. मिथुन यांचा धाकटा मुलगा नमाशीने ही माहिती दिली. मिथुन यांचे वडील बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. आता त्यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्रही हरपलं आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्व आणि राजकीय जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. 

मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाचं वृत्त कळताच तृणमुल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर शओक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, 'मिथुन चक्रवर्ती यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. भगवान मिथुन दा आणि त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी बळ देवो.'

अभिनेते मिथुन सध्या 'डान्स बांगला डान्स' च्या १२ व्या सिझनमध्ये जज आहेत.या शो संबंधित लोकही त्यांच्या दु:खात सहभागी झाले आहेत. त्यांच्या करिअरचा सुरुवातीचा काळ खूपच संघर्षमय होता. तेव्हा ते आईवडील आणि बहीण भावांसोबत राहत होते. ते एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात वाढले. ते नेहमी सांगतात की माझ्या आईवडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले.

Web Title: Mithun Chakraborty s mother Santirani Chakraborty passed away grandson namakshi confirms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.