Mithun Chakraborty : "माझ्या स्टाफकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे होते"; मिथुन चक्रवर्तींनी सांगितला 'तो' वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 04:27 PM2023-11-24T16:27:44+5:302023-11-24T16:42:34+5:30
Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये करिअरची सुरुवात केली आणि अनेक दशकांपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये 'मृगया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. मिथुन इंडस्ट्रीमध्ये एक नवीन स्टार म्हणून उदयास येऊ लागले.
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतरही त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मिथुन चक्रवर्ती यांनी स्वत:च याचा खुलासा केला आहे. 1979 मध्ये मिथुन जेव्हा बासू चॅटर्जी यांच्या 'प्रेम विवाह' चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांनी एका घटनेटचा खुलासा केला आणि सांगितलं की एक काळ असा होता जेव्हा त्यांचे मेकअप मन आणि हेअरड्रेसर त्यांच्यापेक्षा जास्त कमाई करत होते.
मिथुन चक्रवर्ती हे चित्रपटाच्या सेटवर पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची मदत घेत असत. चित्रपटाच्या सेटवर जाण्यासाठी ते बसने प्रवास करत असे, कारण त्यावेळी त्याच्याकडे स्वतःची गाडी आणि घर नव्हतं. 75 रुपये भाडे देऊन पेइंग गेस्ट म्हणून ते राहत होते.
ईटीसी बॉलिवूडशी संवाद साधताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते की, "माझ्या स्टाफकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे होते. मला एका चित्रपटासाठी 5 हजार रुपये मिळायचे आणि माझा स्टाफ 7500 ते 8000 रुपये घेत असे. त्यावेळी 5 हजार माझ्यासाठी 5 कोटी इतके होते. मी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो, ज्यासाठी मी दरमहा 75 रुपये भाडे देत असे. माझ्याकडे एक ट्राऊजर आणि दोन शर्ट होते आणि मी 2 शूजची व्यवस्था केली होती. कसातरी खर्च कमी करून मी माझं घर चालवत होतो."
मिथुन चक्रवर्ती यांनी खुलासा केला की, राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतरही चित्रपटसृष्टीला त्याच्या क्षमतेवर फारसा विश्वास नव्हता. एका दिग्दर्शकाने मिथुन चक्रवर्ती यांचा अपमान केला आणि मिथुनला खूप यश मिळाल्यास तो इंडस्ट्री सोडेल असेही सांगितले. मात्र, त्यांनी या काळात दिग्दर्शकाचं नाव उघड केलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.