'मुंज्या'चा ट्रेलर पाहून राज ठाकरे काय म्हणाले? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:29 PM2024-06-24T12:29:20+5:302024-06-24T12:31:09+5:30

'मुंज्या'चा ट्रेलर पाहून राज ठाकरेंनी दिली खास प्रतिक्रिया. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा खुलासा (munjya, raj thackeray)

mns chief Raj Thackeray watch munjya trailer and give reaction to director aditya sarpotdar | 'मुंज्या'चा ट्रेलर पाहून राज ठाकरे काय म्हणाले? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने केला खुलासा

'मुंज्या'चा ट्रेलर पाहून राज ठाकरे काय म्हणाले? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने केला खुलासा

मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार सध्या चांगलाच चर्चेत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हा हिंदी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलााच गाजतोय. आदित्य सरपोतदारचं यामुळे बॉलिवूडमध्ये कौतुक होतंय. आदित्यने मराठीत 'फास्टर फेणे', 'माऊली', 'नारबाची वाडी' यांसारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. हिंदीत आदित्यने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच 'मुंज्या' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर सुद्धा घवघवीत यश मिळालंय. 'मुंज्या' पाहून मनसे प्रमुख राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय, याविषयी आदित्यने खुलासा केलाय. 

राज ठाकरेंना 'मुंज्या'चा ट्रेलर कसा वाटला?

'मुंज्या' सिनेमाचं हिंदी-मराठी कलाकार कौतुक करत आहेत. अशातच ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत 'मुंज्या'चे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी याविषयी खुलासा केलाय. आदित्य सरपोतदार यांनी राज ठाकरेंना मुंज्याचा ट्रेलर दाखवला. त्यांना ट्रेलर खूप आवडला. सिनेमाविषयी आदित्य आणि राज ठाकरे यांनी चर्चाही केली. मराठी टीम आणि मराठी दिग्दर्शक बॉलिवूडमध्ये काम करतात ही खूप चांगली गोष्ट आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये नाव गाजवणाऱ्या व्यक्तींचं जेव्हा मराठीत कौतुक होतं, तेव्हा मला भरुन येतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

'मुंज्या' सिनेमाविषयी...

'मुंज्या' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. सिनेमात कोकणात घडणारी गोष्ट दिसून येते. या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून मुंज्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  ७ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Web Title: mns chief Raj Thackeray watch munjya trailer and give reaction to director aditya sarpotdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.