काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलवर बलात्कार, अभिनेता जॅकीसोबत नऊ जणांवर एफआरआय दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:05 IST2021-05-31T18:01:44+5:302021-05-31T18:05:41+5:30
काम देण्याच्या बहाण्याने नऊ जणांनी लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप एका मॉडेलने लावला आहे. या संंबधित अभिनेता जॅकीसोबतच नऊ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलवर बलात्कार, अभिनेता जॅकीसोबत नऊ जणांवर एफआरआय दाखल
चंदेरी दुनियेचे एक भयाण वास्तव पुन्हा एकदा लोकांच्या समोर आले आहे. काम देण्याच्या बहाण्याने नऊ जणांनी लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप एका मॉडेलने लावला आहे. या संंबधित अभिनेता जॅकीसोबतच नऊ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील एका मॉडेलने बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्यासह अनेकांवर विनयभंग आणि बलात्काराचा आरोप केला आहे. फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियन याच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. कोलस्टन ज्युलियनने 2014 ते 2018 दरम्यान तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप तिने त्यांच्यावर लावला आहे. तसेच क्वान एन्टरटेनमेंटचे संस्थापक अनिरबान ब्लाह, अभिनेता जॅकी भगनानी, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णू वर्धान इंदुरी यांच्यावर तिने विनयभंगाचा आरोप लावला आहे.
अभिनेता जॅकी भगनानीने वांद्रे येथे तर निखिल कामतने सांताक्रूझमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये, शील गुप्ताने अंधेरी येथील एका इमारतीत तिचा विनयभंग केला तर अजित ठाकूरने 2018 मध्ये विलेपार्ले येथील इमारतीत तिच्यावर बलात्कार केला असे तिने तक्रारीत म्हटले आहे.